Rain tourism should be planned from now on 
कोल्हापूर

राधानगरीतील वर्षा पर्यटनाचे नियोजन आतापासूनच हवे 

मोहन नेवडे

राधानगरी : पावसाळा सुरु झाला की वर्षा पर्यटनाचे वेध लागतात. जलधारा अंगावर घ्याव्या आणि ताजंतवानं व्हावसं वाटतं. यातूनच इथलं वर्षा पर्यटन बहरत आहे. परंतू यंदा कोरोनामुळे जुलैमध्ये राऊतवाडी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाल्यानंतर होणारी पर्यटकांची गर्दीचे नियंत्रण आणि सामाजिक अंतर या बाबी पोलिस यंत्रणा व स्थानिक समितीला आव्हानात्मक ठरणार आहेत. वर्षा पर्यटनाला परवानगी राहणार की बंदी होणार याची सध्यातरी स्पष्टता नाही. 

राऊतवाडी धबधबा सुरक्षित वर्षा पर्यटन स्थळ बनल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. सुट्टी व रविवारच्या दिवशी तर पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, यंदा कोरोना संकटकाळात पर्यटकांचा वावर वाढल्यानंतर सुरक्षित अंतराचा प्रश्‍न समस्या उभी राहणार आहे. त्यासाठी आवश्‍यक खबरदारी न घेतल्यास पर्यटकांच्या आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरणार आहे. पावसाळ्यात कोरोनाचा धोका कायमच राहणार असल्याने पोलिस यंत्रणा व स्थानिक समितीला आतापासूनच उपाययोजना निश्‍चित कराव्या लागणार आहेत. धबधबा स्थळावर एकाच वेळी किमान दोनशेहून अधिक पर्यटकांचा वावर असतो. त्यामुळे सुरक्षित अंतर कसे राहणार ? याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

सुट्टी व रविवारच्या दिवशी धबधबा स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे गेली दोन वर्षे दुपारनंतर धबधबा स्थळाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. धबधबा स्थळी बंदोबस्तासाठी पोलिसांना वाहतूक सुरळीत राखणे याबरोबरच हुल्लडबाज पर्यटकांवर करडी नजर ठेवावी लागते. यंदा कोरोना संकटात गर्दीचे काटेकोरपणे नियंत्रण व असुरक्षित अतंराचा नियम पर्यटकांनी पाळावा यासाठी पोलिस यंत्रणेने ताकद खर्च करावी लागणार आहे. 

धबधबा स्थळावर दर दिवशी ठराविक वेळेत मोजक्‍या पर्यटकांना प्रवेशाने गर्दी नियंत्रित व सुरक्षित अंतर राखले जाणार आहे. धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्यापूर्वीच या स्थळी प्रवेशासाठीची नियमावली आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. त्यानुसार पर्यटकांनी खबरदारी घेतली तरच राऊतवाडीचे वर्षा पर्यटन आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षिततेचे ठरेल गर्दी आणि असुरक्षित वावर कोरोनालाच निमंत्रणच ठरण्याची शक्‍यता अधिक आहे. पर्यटकांच्या गर्दीने पोलिस यंत्रणेवरील ताण वाढण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण करणे जिकरीचे ठरेल. 

राऊतवाडी धबधबा स्थळाचे संवर्धन संरक्षण व देखभालीची जबाबदारी वन्यजीव विभागाने स्थानिक पर्यावरण संरक्षण समितीकडे दिली आहे. या समितीलाच पर्यटकांची गर्दी रोखणे व सुरक्षित अंतर यासाठीच्या उपाययोजना आखाव्या लागतील. 
- विजय खेडकर, विभागीय अधिकारी, वन्यजीव 


यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांसाठी नियमावली व उपायोजना निश्‍चित करण्यासाठी महसूल पोलिस यंत्रणा व स्थानिक समितीची संयुक्त बैठक व्हावी, अशी मागणी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. या बैठकीनंतर धबधबा स्थळी पर्यटक प्रवेशाचा ठोस निर्णय होईल. 
- मोहन पाटील, सदस्य पंचायत समिती, राधानगरी 


दृष्टिक्षेप 
- धबधबे प्रवाहीत झाले सुरक्षित अंतराची समस्या राहणार 
- प्रशासन, पोलिस यंत्रणेला आतापासूनच उपाय करावे लागणार 
- उपाययोजनांची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवावी लागणार 
- हुल्लडबाजांवर ठेवावी लागणार करडी नजर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT