Panchganga River Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain : 22 तासांत पंचगंगेची तब्बल 'इतकी' पाणी पातळी झाली कमी; कोल्हापुरातील 14 धरणांत काय आहे स्थिती?

बावीस तासांत पंचगंगेची तब्बल पाच इंच पाणी पातळी कमी, ४९ बंधारे पाण्याखाली

सकाळ डिजिटल टीम

बावीस तासांत तब्बल पाच इंच पाणी पातळी कमी झाली आहे, तर सध्या ४९ बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात (Kolhapur Rain Update) गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आहे. काल रात्री बारा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ४१ फूट ४ इंच होती, तर आज हीच पाणी पातळी ४० फूट ११ इंच झाली आहे.

बावीस तासांत तब्बल पाच इंच पाणी पातळी कमी झाली आहे, तर सध्या ४९ बंधारे पाण्याखाली आहेत. शहराशेजारी असणारा कळंबा तलाव आज ओसंडून वाहू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने समाधानकारक उघडीप दिली आहे.

शहर परिसरात दुपारी बाराच्या दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यानंतर मात्र विश्रांती घेतली आहे. पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहिले. त्यामुळे राधानगरी धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. बुधवारी (ता.२६) धरणाचे पाच दरवाजे खुले झाले होते.

त्यामुळे विसर्ग झालेले पाणी आता शिरोळ, इचलकरंजीच्या पुढे गेले आहे. जसे-जसे हे पाणी पुढे जात आहे. तसे-तसे राशिवडे, हळदी, शिरगाव येथील पाण्याखाली गेलेले बंधारे खुले होऊन वाहतुकीस रिकामे होत आहेत. काल सकाळी ८० बंधारे पाण्याखाली होते. आज रात्री दहानंतर ४९ बंधारे पाण्याखाली राहिले आहेत. जिल्ह्यातील बंद असलेले सर्व मार्ग हळू-हळू खुले होत आहेत.

राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा खुला

राधानगरी : गेल्या दोन दिवसांपासून राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. तरीही पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे आज दुपारी राधानगरी धरणाचा (Radhanagari Dam) एक दरवाजा पुन्हा खुला झाला आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले असून गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी अधिक साठा आजस्थितीला झाला आहे.

गेल्या वर्षी या धरणामध्ये सहा टीएमसी पाणी शिल्लक होते. यंदा तळ गाठूनही अधिक संचय झाला आहे. सलगच्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण झपाट्याने भरले. याचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतर पूरस्थिती गंभीर बनत होती. मात्र कालपासून पावसाने उघडझाप सुरू केली आहे.

कालच्या तुलनेने आज अधूनमधून सरी येऊ लागल्याने सात स्वयंचलित दरवाजांपैकी एक दरवाजा आज पुन्हा खुला झाला. यातून व वीज निर्मितीसाठी असे एकूण २८०० क्यूसेक पाणी सध्या भोगावती नदीपत्रात येत आहे. मात्र भोगावतीचा पूर ओसरू लागला आहे.

काळम्मावाडी धरण आज ६६ टक्के इतके भरले आहे. १६. ७६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी अधिक पाणीसाठा कमी वेळात झाला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी या धरणात सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणाने तळ गाठला होता.

गतसलीच्या पावसाची तुलना करता आज रोजी पंधराशे नऊ मिलिमीटर पाऊस गतवर्षी होऊन १७.१४ टीएमसी इतका साठा झाला होता. यंदा आजस्थितीला १६५० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे. याचा अर्थ कमी वेळेत गेल्यावर्षी पेक्षाही पाच टीएमसीने अधिक पाणीसाठा काळम्मावाडी धरणामध्ये झाल्याचे दिसते.

दृष्टिक्षेपात पाऊस...

  • पावसाचे प्रमाण कमी राहिले

  • पाणलोट क्षेत्रात जादा पाऊस

  • ४९ बंधारे पाण्याखाली

  • पूरस्थिती धोक्याबाहेर

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ८.३३

  • तुळशी ३.४७ २.१३

  • वारणा ३४.३९ २९.२१

  • दूधगंगा २५.३९ १६.७६

  • कासारी २.७७ २.२३

  • कडवी २.५१ २.५२

  • कुंभी २.७१ २.२३

  • पाटगाव ३.७१ २.९७

  • चिकोत्रा १.५२ १.०३

  • चित्री १.८८ १.६०

  • जंगमहट्टी १.२२ १.०९

  • घटप्रभा १.५६ १.५६

  • जांबरे ०.८१ ०.८२

  • आंबेओहोळ १.१२ -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT