कोल्हापूर : पुढील चार दिवस जिल्ह्यात (kolhapur district) हाय अलर्ट आहे. नदी पात्राशेजारील गावांसह डोंगरी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भूदरगड या डोंगरभागातील तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होणार असल्यामुळे सर्वांनीच सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा कोल्हापूर मंडळचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांचा अभ्यासकरता वीस ते तीस जुलै दरम्यान अतीवृष्टी (heavy rain in kolhapur) होऊन पूराचा धोका होण्याची शक्यता असते. याही वर्षी अशीच स्थिती असणार आहे. नुकताच आज दुपारी भारतीय हवामान वेधशाळेने (MID) दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढे चार दिवस जिल्ह्यात प्रतिदिन ७० ते १५० पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ संभवते, डोंगराळ भागात भूसख्खलन, दरड कोसळणे व जुन्या घरांची पडझड होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आज ऑरेज अलर्ट (orange alert) असल्यामुळे दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. उद्या २१ आणि २२ जुलैला ‘रेड अलर्ट' (red alert) असून २३ जुलैला पुन्हा ‘ऑरेज अलर्ट' भारतीय हवामान वेधशाळेने दिलेला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात हा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवसांत अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. विशेषतः जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भूदरगड या डोंगरभागातील तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
अंदाजीत पावासाच्या प्रमाणानुसार नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असून डोंगराळ भागामध्ये भूसख्ख्लन, दरड कोसळणे, जुन्या घरांची पडझड होणे, या सारख्या घटना होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.