Rajaram Factory Election Result esakal
कोल्हापूर

Rajaram Factory Election Result : बंटी पाटलांच्या उमेदवारांना धक्का देत अमल महाडिकांनी घेतली आघाडी

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सत्ताधारी महाडिक आघाडीनं चांगली आघाडी घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दुपारी एक वाजेपर्यंत सत्तधारी गटाचे 21पैकी 8 उमेदवार हे चांगल्या मताधिक्यांनी आघाडीवर राहिले आहेत.

Rajaram Factory Election Result : कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (25 एप्रिल) मतमोजणी सुरु आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सत्ताधारी महाडिक आघाडीनं चांगली आघाडी घेतली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी गटातील माजी आमदार अमल महाडिक हे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का बसलाय.

दरम्यान, दुपारी एक वाजेपर्यंत सत्ताधारी गटाचे 21पैकी 8 उमेदवार हे चांगल्या मताधिक्यांनी आघाडीवर राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार हे अमल महाडिक 1000 मतांनी आघाडीवर आहेत. सत्ताधारी आघाडीची दुसऱ्या फेरीमध्येही आघाडी कायम राहिली.

उत्पादक गटातून सत्ताधारी गटाचे शिवाजी रामा पाटील (3198), सर्जेराव बाबुराव भंडारे (3173), आणि अमल महादेवराव महाडिक (3358) तर विरोधी सतेज पाटील आघाडीमधील शिवाजी ज्ञानू किबिले (2261), दिलीप गणपतराव पाटील (2328), अभिजीत सर्जेराव माने (2184) पिछाडीवर आहेत.

उत्पादक गट क्रमांक 2

सत्ताधारी महाडिक गट

शिवाजी रामा पाटील - 3198

सर्जेराव बाबुराव भंडारे - 3173

अमल महादेवराव महाडिक - 3358

विरोधी बंटी पाटील गट

शिवाजी ज्ञानू किबिले - 2261

दिलीप गणपतराव पाटील - 2328

अभिजीत सर्जेराव माने - 2184

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 3 पहिली फेरी

बंटी पाटील गट

गायकवाड बळवंत रामचंद्र - 2158

पाटील विलास शंकर - 2068

माने विठ्ठल हिंदूराव - 2361

महाडिक गट

विलास यशवंत जाधव - 2934

डॉ. मारुती भाऊसोा किडगावकर - 3129

सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे) - 3051

सत्तधारी गटाचे 21 पैकी 8 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT