Kolhapur Rajaram Factory Election Sakal
कोल्हापूर

"कारखाना चांगला सुरूये पण, पोरांची लग्न होईनात"; मतदारांनी मतपेटीत टाकल्या चिठ्ठ्या | Kolhapur Rajaram Factory Election

यावरून सध्याच्या लग्नाची परिस्थिती किती गंभीर आहे याची अनुभूती येते.

दत्ता लवांडे

Rajaram Factory Election Result : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडं लागलंय. मतमोजणी सुरू असून मतपेटीमध्ये मतदारांनी काही चिठ्ठ्या टाकल्याचं उघड झालं आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. आज दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे. तर मतदारांनी राजकारण्यांना मतपेटीमध्ये चिठ्ठ्या टाकून सडेतोड सवाल केले आहेत.

Kolhapur Rajaram Factory Election

दरम्यान, ही निवडणूक बॅलेट पेपरवर होत असते. त्यामुळे सभासदांना जे काही म्हणणं मांडायचं असतं ते मतदानाबरोबर त्यावर मांडत असतात. या निवडणुकीत पाच ते सहा चिठ्ठ्या सापडल्या असून माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधी गटावरही मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एका सभासदाने लिहिलं आहे की, "महाडिक साहेब, कारखाना अगदी व्यवस्थित चालू आहे. पण कर्मचाऱ्यांची लग्न होत नाहीत. त्यांच्या ऑर्डरी तेवढ्या काढा. रिटायर्ड व्हायला आली तरी पर्मनंट नाहीत" अशा शब्दांत मतदारांनी खंत व्यक्त केली आहे.

Kolhapur Rajaram Factory Election
Kolhapur Rajaram Factory Election

राज्यातील इतर शहराच्या तुलनेत कोल्हापुरातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलेच चर्चेत असते. तर तेथील मतदारही राजकारण्यांना चांगलंच वठणीवर धरत असतात. त्याचीच प्रचिती सध्या मतदारांनी राजकारण्यांना घडवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे देवगिरीवर दाखल

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT