Kolhapur Farmers Agitation esakal
कोल्हापूर

'..तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याने अंघोळ घालणार'; माजी खासदाराने दिला थेट इशारा

शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी.

सकाळ डिजिटल टीम

शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे ८१ टक्के वीज बिल शासन भरते आणि १९ टक्के शेतकरी, त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी व्हावी.

शिरोली पुलाची : शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाठ वाढ रद्द करावी, जलमापक मीटरची सक्ती रद्द करावी यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन (Maharashtra Irrigation Federation) आणि श्रमिक मुक्ती दलाने पुकारलेला राष्ट्रीय महामार्ग रोको आज पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) लेखी आश्वानानंतर सहा जूनपर्यंत स्थगित करण्यात आला. शासनाने नियोजित केलेल्या बैठकीत याचा निर्णय झाला नाही तर सरकार चालू देणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कृष्णा आणि पंचगंगेच्या पाण्याने अंघोळ घालू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला. कृषिपंपाची शासकीय पाणीपट्टीत दहापट दरवाढ रद्द करून सवलतीच्या दराने पाणीपुरवठा करावा, शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी, राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग घनमीटर पद्धतीने पाणी वाटप करीत नाही, तोपर्यंत कृषिपंपाना जलमापक मीटरची सक्ती नको.

शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे ८१ टक्के वीज बिल शासन भरते आणि १९ टक्के शेतकरी, त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी व्हावी. भ्रष्टाचार थांबवावा व २० टक्के लोकल फंड रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दलाने महामार्ग रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे आज प्रशासनाने आंदोलकांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. यामुळे महामार्ग रोको आंदोलन रद्द करून, बैठकीतील चर्चेची माहिती देण्यासाठी पंचगंगा पुलाजवळ सेवा मार्गावर सभा झाली.

त्यात डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘प्रशासनाबरोबर दोन बैठका झाल्या असून मागण्यांबाबत ६ जून रोजी निर्णय देण्याची लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आमच्या मागण्याबाबत योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करून, राज्य सरकारला घरी पाठवू.’’ मंचावर उपस्थित असणाऱ्या साखर कारखानदार आणि लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या सर्वच आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, माजी खासदार प्रतीक पाटील, आर. जी. तांबे, जे. पी. लाड यांनी मनोगतात ६ जूनला निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या वेळी भारत पाटील, शशिकांत खवरे, राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, एस. एम. क्षीरसागर, देवराज पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातून शेतकरी आणि पाणीपुरवठा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाहतूक काही काळ विस्कळीत

कोल्हापूरच्या दिशेने दुपारी बारा वाजता येणाऱ्या आंदोलकांनी तावडे हॉटेल परिसरात वाहने पार्क केली. तेथून पंचगंगा पुलावरून चालतच आंदोलन स्थळी आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक महामार्गावर आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर सरकारला सापडला असेल. त्यामुळेच सरकारने कृषिपंपाना जलमापक मीटरची सक्ती केली असावी.

- सतेज पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT