Raju Shetty 
कोल्हापूर

एकरकमी ‘एफआरपी’सह ३५० रुपये द्या : शेट्टी

गतवर्षीच्या उसाला एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये प्रति टन मिळण्याच्या मागणी

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी एकरकमी एफआरपी १४ दिवसांच्या आत मिळावी. एफआरपीशिवाय अधिकचे प्रति टन ३५० रुपये कारखाना बंद झाल्यावर मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

गतवर्षीच्या उसाला एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये प्रति टन मिळण्याच्या मागणीसाठी ७ नोव्हेंबरला पुण्याच्या साखर आयुक्तालय कार्यालयावर धडक मोर्चा काढू. १७ व १८ नोव्हेंबर रोजी दोन दिवस ऊसतोडी रोखू, असा इशारा त्यांनी दिला. जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. पावसाचे सावट असतानाही राज्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परिषदेस हजेरी लावली.

शेट्टी म्हणाले, ‘‘उसाच्या कांडीला सोन्याचा भाव घ्या. ऊस भंगाराच्या किमतीत देऊ नका. त्या साठी लढा उभारू. साखर कारखान्यांचे ऑडिट अद्याप झाले नाही. ऑडिट करा आणि मागचे पैसे द्या, अशी आमची मागणी आहे. ७ नोव्हेंबरच्या आत प्रत्येक कारखान्याचा ‘आरएसएफ’चा फॉर्म्युला ठरला पाहिजे. वजनकाटे ऑनलाइन करण्यासाठीही हा एल्गार होणार आहे. कारखान्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देत आहे. या कालावधीत कारखान्यांनी मागील बाकी शेतकऱ्यांना द्यावी.’’

‘‘गेल्या वर्षी साखर उद्योगाला चांगले दिवस होते. सुदैवाने ब्राझीलमध्ये साखर कमी झाली. यामुळे आपली १०० लाख टन निर्यात झाली. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात दर चांगले होते. इथेनॉलच्या उत्पादनामुळे कारखान्यांना प्रचंड पैसा मिळाला. ते पैसे शिल्लक आहेत. ते घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देत कारखान्यांना होणारा फायदा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.’’ असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT