Dipcadi flower esakal
कोल्हापूर

Dipcadi Flower : दिपकाडी : एक दुर्मीळ प्रजाती; कोकणात 23 ठिकाणी आढळते ही वनस्पती, काय आहे खासियत?

कोकणी माणसासारखा कणखर कातळ निर्जीव नापीक निराकार होऊन निपचित पाडून असतो.

सकाळ डिजिटल टीम

काळा कातळ या पांढऱ्या फुलांनी पूर्ण भरून जातो. कोकणात याला गौरीची फुलं पण म्हणतात. बऱ्याच बायका याचे गजरे करून डोक्यात घालतात आणि गणपती सजावटीसाठी पण वापरतात.

-प्रतीक मोरे, देवरूख moreprateik@gmail.com

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा…. कवी गोविंदाग्रज यांच्या काव्य पंक्ती जिथे प्रत्यक्षात जमिनीवर दिसतात तो कोकण सडा. सूर्याच्या प्रखर उन्हाने तापून काळा झालेला, धरिणीच्या गर्भातून बाहेर आलेल्या तप्त लाव्हा रसाच्या खुणा आपल्या अंगावर अभिमानाने बाळगणारा आणि इथून तिथलं पलीकडल दिसेल एवढा सपाट कातळ कडा. मे महिन्याच्या अखेरीस जीवनाच्या खुणा इथ मिळणं तर दुरापास्तच.

कोकणी माणसासारखा कणखर कातळ निर्जीव नापीक निराकार होऊन निपचित पाडून असतो. मग कुठून तरी खाऱ्या वाऱ्यांची चाहूल लागते. समुद्राच्या बाष्पाने जड झालेले वारे जोराने धावू लागतात. आकाश पण खूश होऊन एखादी वीज कातळाला जागं करण्यासाठी पाठवते. विजेच्या कल्लोळाने जागा झालेला सडा अवचित पावसाच्या तुषाराने भानावर येतो आणि आपल्या पोटात साठवलेल्या लाखो जीवनाच्या थैल्या मोकळ्या करू लागतो.

पावसाच्या सरी आणि जमणारे ढग कंदवर्गीय वनस्पतींना संजीवनी देतात, महिन्याच्या शेवटी पावसाळी ढग जमायला सुरुवात झाली, की या कंदवर्गीय वनस्पतीला पाने फुटायला सुरुवात होते आणि थोड्या दिवसाने कातळाच्या हृदयाला छेद देत एक काडी प्रकट होते ती आपली एक दांडी. Dipcadi concanense या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती तिच्या एकाच दांडीला येणाऱ्या सुंदर फुलामुळे एकदांडी किंवा ढोकाच फुल नावाने प्रसिद्ध आहे.

कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचे अस्तित्व दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण फक्त २३ ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी १९ ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यातील असून, उरलेली पाच सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली (देवरुख), रत्नागिरी विमानतळ, जैतापूर, सागवे, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) ही या वनस्पतीच्या आढळाची प्रमुख ठिकाणे आहेत.

कातळावर या वनस्पतीची गवतासारखी पाने इतर वनस्पतींच्या तुलनेने अगोदरच वाढतात. त्या वेळी अन्य चारा कमी असल्याने गुरे ही पाने खातात; मात्र पावसाळा सुरळीत चालू झाला, की गुरांना खायला चारा उपलब्ध होतो आणि मग ती या वनस्पतीकडे दुर्लक्ष करतात. पुढे हळूहळू या वनस्पतीला एक दांडी येते आणि मग कळ्या येतात. त्यानंतर सुरू होतो तो मात्र नजारा. काळा कातळ या पांढऱ्या फुलांनी पूर्ण भरून जातो. कोकणात याला गौरीची फुलं पण म्हणतात. बऱ्याच बायका याचे गजरे करून डोक्यात घालतात आणि गणपती सजावटीसाठी पण वापरतात.

काही ठिकाणी या फुलांचा वापर गजरे, हार आणि वेण्या बनवण्यासाठीही केला जातो. रत्नागिरी, देवरुख आणि देवगडच्या बाजारपेठेत ही फुले विक्रीलाही आलेली दिसतात. म्हणजे या वनस्पतीमुळे या भागात या काळात छोटासा व्यवसायच उपलब्ध होतो. पावसाळा संपताच सर्व पाने सुकून मरून जातात; कंद मात्र पुढील पावसाळा येईपर्यंत जमिनीत जिवंत राहतो. मानवी हस्तक्षेप, व्यावसायिक बांधकाम आणि रस्ता रुंदीकरण यामुळे या वनस्पतीच अस्तित्व आता धोक्यात आले आहे. यासाठी वेळीच प्रयत्न होन गरजेचं आहे. अगदी छोटस जीवनक्रम आणि आढळ असणारी ही दिपकाडी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होण गरजेचं आहे नाहीतर आपण एका दुर्मीळ प्रजातीला मुकणार आहोत.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT