कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (hospital)समोरील केएमटी बस स्टॉपवर ऊन, वारा, पाऊस, कोरोनाचा (Corona) संसर्ग संकटात गेली पाच वर्षे मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शालन जाधव यांना नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठान उपचार व पुनर्वसन केंद्रात अवनी आणि एकटी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केले.
१५ ते २० वर्षे घर सोडून बाहेर रस्त्यावर फिरस्ते म्हणून हलाखीचे जीवन जगणाऱ्या शालन यांना अवनि संस्थेने मोकळा श्वास दिला. मागील पाच वर्षांपासून सीपीआर समोरील बस स्टॉपवर या महिलेने संसार मांडला होता. रस्त्यावर सापडलेल्या चिठ्या, चटोऱ्या, पत्रिका पाकिटे, कागदे, दोरे यांचे पाच वर्षांपासून गाठोडी बांधून ठेवली होती.
या गाठोड्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अख्खा टेंपो भरला. या आजीची त्या स्टॉपवरून सुटका करून तिच्या गावी तात्पुरते स्थलांतर केले. ती निगावे दुमाला गावची रहिवाशी असल्याचे समजल्यानंतर निगवे ग्रामपंचायतीमध्ये नेऊन तिची ओळख पटल्यानंतर तिला दोन मुले, नातवंडे असल्याचे समजले.
तिच्या नातवाला आणि सुनेला बोलावून घेतल्यानंतर ती गेली पाच वर्षांपासून घराबाहेर असल्याचे समजले. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असून राहायला व्यवस्थित घर देखील नाही. तिच्यावर उपचार करण्यासाठीचा खर्च त्यांना पेलवत नसल्याने तसेच उपचारास घेऊन जाण्यास ती सहकार्य करत नसल्याने ती घराबाहेर होती.
एकटी संस्थेच्या सहकार्याने तिच्यावर कायमस्वरूपी चांगले उपचार, कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान करणार आहे. तिला नगर येथे पाठविण्याचा जो खर्च आहे, तो तिच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिला. अवनि संस्थेच्या शेल्टर फॉर मेंटली इल प्रकल्प व्यवस्थापक वृषाली चौगले, प्रियांका पोवार, एकटी संस्था कर्मचारी पुष्पा कांबळे, अभिजित कांबळे यांनी तिला माऊली सेवा प्रतिष्ठान, याठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.