जोतिबा डोंगर :येथील सिद्धेश सर्जेराव घोरपडे हा सायकलपटू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली येथे त्याचा सराव सुरू आहे. सिद्धेशचा कुशिरे ते दिल्लीपर्यंतचा प्रवास फार खडतर व प्रेरणादयी आहे.
तो एकदा जत्रेनिमित्त सायकल स्पर्धा बघण्यासाठी गेला. तेथे त्याने मित्राची सायकल घेऊन सहभाग घेतला व त्याने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर कुशिरे गावातील क्रीडाशिक्षक प्रकाश ठाणेकर यांनी त्याला सायकलिंगमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
शिंगणापूर (ता. करवीर) येथील कपिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सायकलचा सराव सुरू केला. त्याने जोतिबा घाट, गिरोली घाट, शिये, कसबा बावडा रोड या ठिकाणी पहाटे ५ सकाळी ९ पर्यंत सराव सुरू केला. त्याने ठिकठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन त्या जिंकल्या.
त्याची बालेवाडी पुणे येथे क्रीडा संकुलात निवड झाली. तिथे सराव करत तो महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करू लागला. पुढे त्याची आळंदी येथील राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली. तेथे सुवर्ण व कांस्यपदक पटकावले. जयपूर (राजस्थान) येथे ७३ व्या राष्ट्रीय ट्रॅक स्पर्धेत त्याची महाराष्ट्रातून निवड झाली.
तेथे त्याने राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्याची सध्या महाराष्ट्रातून दिल्ली येथे राष्ट्रीय सायकलिंग अकॅडमी येथे निवड झाली असून, तेथे त्याचा सध्या जोरात सराव सुरू आहे. सायकलिंगमधील सायकल रोडरेस, एमटीबी (माऊंटन बाईक) व ट्रॅक सायकलिंग या तिन्ही प्रकारात त्याने स्पर्धा जिंकल्या आहेत .
त्याला महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे प्रताप जाधव, दीपाली पाटील (पुणे), दीपाली शिळदनकर (पुणे), दर्शन बारगुजे (पुणे), विजय जाधव (कोल्हापूर), कपिल कोळी (शिंगणापूर), प्रकाश ठाणेकर (कुशिरे) तसेच वडिल सर्जेराव घोरपडे, आई अनुराधा घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले .
कुशिरे ते दिल्ली हा सिद्धेशचा प्रवास फार कष्टमय आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आता जवळ आली आहे .
सर्जेराव घोरपडे, वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.