इचलकरंजी (कोल्हापूर) : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) उद्या (शनिवार) सकाळी 11 वाजता आयजीएम रुग्णालयास भेट देवून कामकाजाचा आढावा घेणार आहेत. आयजीएम रुग्णालयाकडील (IGM Hospital Ichlkarnji)अनेक प्रस्ताव प्रलंबीत आहेत. त्याबाबत कोणती घोषणा करणार काय, याबाबत उत्सुकत आहे. दरम्यान, आयजीएम रुग्णालयाला सुविधा देतांना जिल्ह्यातील मंत्र्यांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांच्या भेटीला विशेष महत्व आले आहे.
Rural Development Minister Hasan Mushrif visit from ichalkaranji kolhapur news
येथील आयजीएम रुग्णालय सद्या कोवीड रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी प्रमाणापेक्षाही जास्त रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पण त्या तुलनेने आवश्यक अशा सुविधा अद्याप या रुग्णालयात नाहीत. अपुरा वैद्यकीय स्टाप आहे. स्वच्छता कर्मचार्याची वाणवा आहे. सीटीस्कॅन सारखी सुविधा अद्याप उपलब्ध नाही. फायर ऑडीटमध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. तसेच कांही दिवसांपूर्वी आसीयु युनिटमध्ये हायफ्लो मशिनला आग लागली होती. त्यामुळे अद्याप सुसज्ज असे रुग्णालय झालेले नाही.
दरम्यान, आयजीएम रुग्णालयाच्या मदतीच्या विषयावरुन आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर तोफ डागली होती. इचलकरंजीला मदत करतांना मंत्र्यांच्या कपाळ्यावर आट्या पडतात, असा थेट आरोप केला होता. त्याला स्थानिक महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले होते. तसेच मंत्री मुश्रीफ यांनीही आवाडे हे प्रसिध्दीसाठी हा खटाटोप करीत असावेत, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवार) सकाळी 11 वाजता मंत्री मुश्रीफ आयजीएम रुग्णालयाला भेट देवून आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते प्रांत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते आयजीएम रुग्णालयाच्या बाबतीत कोणते धोरणात्मक निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय आमदार आवाडे यांच्या टिकेला ते यावेळी प्रत्युत्तर देणार काय, याबाबतची शहरातील राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
Rural Development Minister Hasan Mushrif visit from ichalkaranji kolhapur news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.