Anuskura Ghat esakal
कोल्हापूर

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात खरंच लुटारू आहेत, घाटातून प्रवास करणं असुरक्षित? पोलिसांनी सांगितलेली Real Story काय?

सध्या अनुस्कुरा घाटात लूट मार सुरू असल्याचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

राजेंद्र बाइत

याप्रकरणी संशयित चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.

राजापूर : दुचाकी चोरी करून अणुस्कुरा घाटमार्गे (Anuskura Ghat) कोल्हापूरच्या दिशेने पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांचा येरडवच्या जंगल परिसरात सुमारे तीन तास केलेल्या अथक शोधानंतर अल्पवयीनास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यापैकी एक दुचाकी संगमेश्‍वर येथे चोरीला गेलेल्यापैकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

काल रात्री १० वा.च्या सुमारास त्या तिघांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. संबंधित अल्पवयीन मुलाकडे केलेल्या चौकशीमध्ये दीपक श्रीमंदीलकर, अजय घेडगे (दोघे रा. नगर) अशी पसार असलेल्यांची नावे पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्‍वर पोलिस ठाण्यांतर्गंत दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. सायंकाळी ५ वा.च्या सुमारास दोन विना नंबरप्लेट मोटारसायकलवरून येत तीन तरुणांनी चारचाकी वाहनांना धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न ओणी येथे केला होता.

यावेळी झालेल्या ओरड्यानंतर त्या तरुणांनी तेथून पळ काढून पाचल-अणुस्कुरामार्गे कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले. याबाबतची माहिती रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला मिळाल्यानंतर तेथील ठाणे अंमलदार कमलाकर तळेकर यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून त्यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर अणुस्कुरा चेकपोस्ट येथे नाकाबंदी केली. तिघे तरुण मोटारसायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले असता तेथील नाकाबंदी असल्याचे पाहून दुचाकी सोडून येरडव, अणुस्कुरा जंगलात पळ काढला. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण सहकाऱ्‍यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.

एका दुचाकीची ओळख पटली

ज्या दोन मोटारसायकल अणुस्कुरा चेकपोस्ट येथे सोडून तिघे पसार झाले. त्यापैकी एक मोटारसायकल (एमएच ४६ एटी २६२१) ही संगमेश्वर येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मोटारसायकल सुनील भार्गव सुर्वे (मुचरी, ता. संगमेश्वर) यांच्या मालकीची आहे.

अनुस्कुरा घाटातून सुरक्षित प्रवास सुरू

सध्या अनुस्कुरा घाटात लूट मार सुरू असल्याचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. या मेसेजबाबत शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, पुण्यातील तीन तरुणांनी संगमेश्वर येथील मोटरसायकलची चोरी केली होती. संबंधित तरूण अनुस्कुरा मार्गे पुण्याला जाणार होते. ही माहिती पोलिसांना कळताच संबंधितांना पकडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र, पोलिसांच्या भीतीपोटी सदर तरुण गाड्या रस्त्यातच टाकून भीतीने जंगलात पळून गेले व नंतर रस्त्यावर येऊन पुण्याला जाण्यासाठी गाड्यांना हात करत होते. मात्र, पोलिसांनी त्यातील एकास ताब्यात घेतले आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अनुस्कुरा घाटात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून या मार्गावर कोणताही धोका नसून प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या मार्गावर सध्या कोणताही धोका नसून वाहतूक सुरळितपणे सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT