sakal joy street event kolhapur actively participating inauguration by hasan mushrif Sakal
कोल्हापूर

Sakal Joy Street : आनंद पेरला... आनंद लुटला... ‘सकाळ’ आयोजित ‘जॉय स्ट्रीट’मध्ये कोल्हापूरकरांचा सहकुटुंब जल्लोष

कुडकुडणाऱ्या थंडीत कोवळ्या उन्हाच्या किरणांनी हजेरी लावली आणि त्यांच्या साक्षीनेच आजची सकाळ कोल्हापूरकरांनी अविस्मरणीय ठरवली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आयोजित ‘जॉय स्ट्रीट’ उपक्रमाचे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कुडकुडणाऱ्या थंडीत कोवळ्या उन्हाच्या किरणांनी हजेरी लावली आणि त्यांच्या साक्षीनेच आजची सकाळ कोल्हापूरकरांनी अविस्मरणीय ठरवली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आयोजित ‘जॉय स्ट्रीट’ उपक्रमाचे. सायबर चौकात झालेल्या या आनंदोत्सवात तीन पिढ्या एकवटल्या. वारणा दूध संघ या उपक्रमाचे सहप्रायोजक होते.

सकाळी सहापासूनच येथे कोल्हापूरकरांची मांदियाळी अवतरली आणि सहकुटुंब सेलिब्रेशनला प्रारंभ झाला. ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषांसह कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांवर आधारित रॅप सॉंगसह शिवकालीन युद्धकलांच्या थराराने उत्साह आणखीनच टीपेला पोहोचला.

दिमाखदार उद्‍घाटन सोहळा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उपक्रमाचे दिमाखदार उद्‍घाटन झाले. यावेळी ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव व उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते पालकमंत्री मुश्रीफ, वारणा दूध संघाचे मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, सेल्स मॅनेजर आर. व्ही. देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जयेश ओसवाल यांचे स्वागत केले.

त्यानंतर सहकुटुंब आलेल्या कोल्हापूरकरांबरोबरच मित्र-मैत्रिणी, लहान मुले, ज्येष्ठांनी ‘जॉय स्ट्रीट’वर सुमारे तीन तास विविध खेळ, कलाविष्कारांचा मनमुराद आनंद लुटत संडे खऱ्याखुऱ्या अर्थाने ‘फन डे’ बनवला.

हास्य, पारंपरिक खेळ अशा विविध प्रकारांतून आनंद लुटता येतो. त्यांचा आनंद मनसोक्त लुटला, तर आयुष्य सुखी होते. ‘सकाळ’ने चांगली संकल्पना राबविली आहे. धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्‍वाचा आहे.

‘सकाळ’च्या निर्भीड पत्रकारितेचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर सामाजिक दायित्व निभावण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच वाचकांसाठी मोठी पर्वणी आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या उपक्रमाला मनापासून खूप शुभेच्छा आहेत, असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.

या उपक्रमाची संकल्पना मांडताना संपादक निखिल पंडितराव म्हणाले, ‘सर्वांना वेगवेगळ्या पातळींवरील आनंद देण्याचा ‘सकाळ’चा नेहमी प्रयत्न असतो. आनंद घेण्याच्या विविध प्रकारांतील हा एक प्रकार आहे. प्राचीन संस्कृतीपासून आपली आनंदाची परंपरा आहे.

आनंदाची व्याख्या माणसागणिक बदलते. त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हेच ‘जॉय स्ट्रीट’मधून घेऊन आलो आहोत. १३ विविध पारंपरिक खेळ तसेच विविध कला, योग, मेडिटेशनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आनंद पेरला जात असून, आनंद लुटण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या साऱ्यातून आनंदी जगता येते.’

यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्‍न भेडसावू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने पाणी वाचविण्याचा निर्धार करण्याची गरज आहे. एका नळातून गळणाऱ्या एका थेंबातून प्रतिवर्षी १२९६ लिटर वाया जाते. दुसऱ्या दिवशी पाणी शिळे होते म्हणून दररोज ओतल्या जाणाऱ्या १० लिटरच्या घागरीमुळे आठवड्याला ७० लिटर पाणी वाया जाते. हे प्रकार टाळून बचतीचा प्रयत्न आपल्या सर्वांना करावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आनंदोत्सवाची क्षणचित्रे...

  • दौलतनगरमधील शुभ्रा रमेश गवळी, केदार रणजित पाटील, पायमल वसाहतीतील मानसी संतोष जाधव, अथर्व संतोष जाधव यांच्यासह प्राजक्ता निशिकांत चोपडे यांनी लाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली

  • अस्सल कोल्हापुरी भाषेत संवाद साधत आणि विविध स्वरूपातील मिमिक्री करत विजयालक्ष्मी यांनी उपस्थितांना खळखळून हसविले. डोरेमन, शिंचन, नोबिता या कार्टून पात्रासह गायिका आशा भोसले, अभिनेत्री राखी आणि काजल, बुलेटचा आवाज काढत त्यांनी हास्य फुलविले

  • अनिकेत कांबळे आणि निहाल नदाफ यांनी कोल्हापुरी रॅप सॉंग सादर केले. त्यातून त्यांनी राजकारण, रोजगार, शिक्षण, आदींबाबतच्या वास्तवाचे दर्शन घडविले. ‘मेयो-मेयो’च्या तालावरील गीत सादर करून त्यांनी समाजासमोरील प्रश्‍न मांडले. त्याला उपस्थितांची दाद

  • मुख्य व्यासपीठावर रवी चव्हाण यांनी ठेका धरायला लावणाऱ्या संगीताच्या तालावर घेतलेल्या ‘झुम्बा’मध्ये सर्वजण सहभागी झाले.

  • मराठी-हिंदी-इंग्रजीतून संवाद साधत आणि ‘वन मिनिट चॅलेंज गेम’ घेत मोनिका जोसुजा यांनी उपस्थितांचा उत्साह वाढविला

  • ‘प्लॅश मॉब’मध्ये मराठी आणि हिंदीमधील गीत-संगीताच्या तालावर अाबालवृद्धांनी बेधुंद नृत्याचा फेर धरला

  • कमरेभोवती रिंग फिरविण्याची बालचमूंसह प्रौढांनी केली कवायत

  • कॉमर्स कॉलेजमधील १९८८च्या बॅचमधील स्पंदन ग्रुप उत्साहात सहभागी

  • ग्रुपच्या सदस्यांनी स्टेजवर येऊन केले नृत्य

  • हँड ॲन्‍ड फीट हॉपस्कॉच गेमला बालचमूंची दाद

  • हँड ॲन्‍ड फीट गेमने केले युवकांनाही आकर्षित

  • सापशिडीत रमला मुला-मुलींसह महिला वर्ग

  • फुटबॉलप्रेमींनी लुटला फुटबॉलचा आनंद

  • लहान मुलांसह युवकांचा फुटबॉलमध्ये उत्साह

  • टेबल-टेनिसवर खेळले टेनिसपटू

  • महिला व युवतींचा बॅडमिंटनमध्ये सहभाग

  • महिला, मुलींनी अनुभवले मेहंदी, नेल आर्टचे जग

  • आर्टिस्ट संगीता सावर्डेकर व सहकाऱ्यांची दाखवले नेल आर्टचे विविध पैलू

  • चित्रकारांनी साकारली लाईव्ह पोर्टेट

  • कॅलिग्राफीतून वळणदार अक्षरांतून कोरले अनेकांनी स्वतःचे नाव

  • लाईव्ह बँडमधून एकापेक्षा एक रॉक साँग, उपस्थितांनी दिली दाद

  • सायकलिंगसह दोरी उड्यांचाही आनंद

एकमुखाने केला पाणी बचतीचा संकल्प

‘जॉय स्ट्रीट’च्या निमित्ताने आनंद लुटतानाच कोल्हापूरकरांनी पाणी बचतीचा एकमुखाने संकल्पही केला. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि पर्यायाने धरणांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. साहजिकच फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक रविवारी कोल्हापूरकर ‘जॉय स्ट्रीट’मधून पाणी बचतीच्या विविध संकल्पनांही मांडणार आहेत आणि कृती कार्यक्रमावरही भर दिला जाणार आहे.

पुढील रविवारी एकवटूया, ताराबाई पार्कात

पुढील रविवारी (ता.४) ‘जॉय स्ट्रीट’ उपक्रम ताराबाई पार्कातील सर्किट हाऊस रस्त्यावर होणार आहे. सकाळी साडेसहाला या उपक्रमाला प्रारंभ होणार असून, येथे विविध मुक्ताविष्कारही साकारता येणार आहेत. चला, तर मग आजच तारीख व वेळ राखून ठेवा. रविवारी (ता.४) पुन्हा एकवटूया, आनंद पेरूया, आनंद घेऊया..आनंदोत्सव साजरा करूया...!

मनसोक्त आनंद लुटला तर आयुष्य सुखी होते. जीवनातील हाच आनंद ‘सकाळ’ने ‘जॉय स्ट्रीट’मधून कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध केला आहे. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या.

-हसन मुश्रीफ, पालकमंत्री

कोल्हापुरांसाठी ही एक आनंदाची पर्वणी असून, ‘सकाळ’ने नेहमीच अशा उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे. अधिकाधिक कोल्हापूरकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन आनंद लुटावा.

- मोहन येडूरकर, कार्यकारी संचालक, वारणा दूध संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT