chandrshekhar bavankule esakal
कोल्हापूर

Sangali : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना घेराव घालू

भाजपच्या नाराज निष्ठावंतांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

सांगली : जिल्ह्यात भाजप रुजण्यासाठी संघर्ष करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांना घेराव घालण्याबरोबरच प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आज सांगलीत बैठक झाली. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या बैठकीत नाराज कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजपचे बीज रोवून रोपटे वाढविले, त्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सध्या नेते गृहीत धरत नाहीत. प्रदेश नेतृत्व या कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

निष्ठावंत कार्यकर्त्यांची आजची ही तिसरी बैठक होती, तरीही जिल्हा अथवा ‘प्रदेश’च्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून निदर्शने करण्याचा इशाराही देण्यात आला. जिल्ह्यात येणाऱ्या ‘प्रदेश’च्या पदाधिकाऱ्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात येणार आहे. पुन्हा एकदा भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागेल, असा इशाराही या गटाने दिला. बैठकीस प्रताप पाटील, प्रदीप वाले, डॉ. योगेश लाड, विनायक खरमाटे, अॅड. श्रीपाद आष्टेकर, भारत निकम, संजय हिरेकर, संजय कोरे, भगवान पाटील, सुरेश कोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT