Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire  esakal
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Theatre Fire : राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला वारसा पुन्हा नव्याने उभारू...

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire : संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांनी शास्त्रशुद्ध आणि पल्लेदार गायकीने रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य केले.

सकाळ डिजिटल टीम

यंदा राजर्षी शाहूंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यामुळे त्यांनी उभारलेला हा ऐतिहासिक वारसा पुन्हा उभारणे, ही प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे.

कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार. इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर जरी गाजला तरी तो कोल्हापुरात (Kolhapur) आला की ‘केशवराव’च्या स्टेजला पहिले नमन करतो. त्याच पद्धतीने येथील कर्मचारीही नाट्यगृहाची सेवा एक मंदिर म्हणूनच करतात. पण, आज नाट्यगृहच आगीत (Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire) बेचिराख झाले आणि साऱ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला.

शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्यासाठी आता ‘मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा’, ‘मी या गटाचा, मी त्या गटाचा’ हे सर्व हेवेदावे खुंटीला टांगून एकदिलाने राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला हा वारसा पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी एकत्र या.

संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांनी शास्त्रशुद्ध आणि पल्लेदार गायकीने रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य केले. ‘ललितकलादर्श’ नाटक कंपनीसाठी त्यांनी स्पेशल रेल्वे घेतली होती. वयाच्या दहाव्या वर्षी केशवरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला आणि ते रंगमंचावर आले. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची (Chhatrapati Shahu Maharaj) प्रशंसा मिळवली. महाराजांनी बांधलेल्या पॅलेस थिएटरचे उद्‌घाटन १४ ऑक्‍टोबर १९१५ ला ‘ललितकलादर्श’च्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकाने झाले.

प्रयोगांमधून मिळालेला पैसा त्यांनी कोल्हापुरात अंबाबाई मंदिराचे शिखर पाजळण्यात आणि लोकोपयोगी कामातच खर्च केला. ‘संयुक्त मानापमान’ नाटकाच्या रूपाने केशवराव व बालगंधर्व एकत्र आले. टिळक स्वराज्य फंडाच्या निधीसाठी ७ जुलै १९२१ ला बालीबाला थिएटरमध्ये हा अनोखा प्रयोग झाला. त्याला पहिले तिकीट शंभर रुपयांचे आणि शेवटचे पाच रुपयांचे होते.

अवघ्या अर्ध्या तासात सर्व तिकिटे संपली आणि त्यातून एकोणीस हजार रुपये जमा झाले. राजर्षी शाहू महाराजही ‘माझा केशा तळपती तलवार आहे...’ असे अभिमानाने सांगायचे. हा सारा देदीप्यमान इतिहास नाट्यगृहाच्या निमित्ताने चिरंतन जपला गेला होता. मात्र, आता हे नाट्यगृहच बेचिराख झाल्याने या स्मृतीही कायमच्या नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळेच आता ही वास्तू पुन्हा उभी राहावी, ही तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे.

...तरच राजर्षी शाहूंना खरे अभिवादन

यंदा राजर्षी शाहूंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यामुळे त्यांनी उभारलेला हा ऐतिहासिक वारसा पुन्हा उभारणे, ही प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे. यासाठी केवळ घोषणा न करता कृतिशील पावले टाकावीत. आज बेचिराख झालेले नाट्यगृह कलाकार-तंत्रज्ञांनी डोळ्यांदेखत पाहिले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण, ते पुन्हा उभे करण्यासाठीचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्यासोबत आता राजकीय इच्छाशक्तीबरोबरच सर्वच जबाबदार घटकांनी पुढाकार घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT