देवराष्ट्रे (सांगली) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रोज नव्या रुग्णांची भर तसेच मृत्युनेही परिस्थिती गंभीर होत आहे. मृतांमध्ये वयोवृद्धासह तरुणही आहेत. अशा भयावह परिस्थितीत प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर मोहित्यांचे वडगाव येथील स्वातंत्र्यसैनिक महादेव मोहिते यांची बहीण म्हणून सर्वपरिचित असलेल्या 95 वर्षीय आजी भागीरथी जाधव यांनी घरातच औषध उपचार घेऊन कोरोनाला चितपट केले. व नकारत्मकतेच्या वातावरणात सकारात्मकतेची पेरणी केली आहे.
मोहित्यांचे वडगाव येथील 95 वर्षीय आजी भागीरथी जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तिघा जणांवर घरीच उपचार सुरु होते. तर एकास चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर दोन दिवसाच्या कालावधी नंतर भागीरथी जाधव यांना ताप, डोकेदुखी त्रास होऊ लागला त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर केली मात
आजीची ऑक्सजिन लेव्हल 92 होती. खरे तर कोरोना या शब्दानेच अनेकांना धडकी भरते . कोरोनाची बाधा झाल्याचे समजतात बरेच रुग्ण मानसिक दृष्ट्या खचतात. अत्यंत कमी प्रमाणात कोरोनाची लागण असूनही असे खचलेले रुग्ण बिकट अवस्थेत पोहचतात. परंतु 95 वर्षीय आजी भागीरथी जाधव प्रचंड इच्छाशक्तीच्या आहेत. त्यांच्या घरातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झालेली असताना खचून न जाता धैर्याने तोंड देत जिद्दीने त्यांनी कोरोनाचा सामना करून कोरोनाला चितपट केले.
असा घेतला आहार
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मांसाहार, अंडी, चिकन व प्रोटिनयुक्त आहाराचा जेवणात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देत होते. परंतु भाजी, भाकरीच आजी आहारात घेत होत्या. मोहित्यांचे वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर सागर जाधव यांनी आजीवर उपचार केले. त्यामुळे सकारात्मक विचार ,प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर 95 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली हा प्रेरणादायी संदेश आहे.
सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कोरोनाला घाबरून न जाता प्राथमिक लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. मनोधर्य खंबीर ठेवल्यास कोरोनाला हरवणे शक्य आहे. 95 वर्षीय आजी भागीरथी जाधव यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे.
विजय मोहिते,सरपंच मोहित्यांचे वडगांव.
Edited By- Archana Banage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.