eggs sakal
कोल्हापूर

Sangli : अंड्यांचे दर गडगडले !

खानापूर तालुक्यात रोज १६ लाखांचा फटका : उत्पादकांचा ‘नेक’ वर आरोप

दिलीप कोळी

विटा- अंड्यांचे दर पडल्याने खानापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना दररोज १६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (नेक) अंड्यांच्या दरात चढउतार करून आर्थिक पिळवणूक करत असल्याचे पोल्ट्रीधारकांचे म्हणणे आहे. अंड्यांच्या दरात चढउतार न करता प्रतिअंडे ५ रुपये २५ पैसे इतका दर स्थिर ठेवावा, अशी मागणी आहे.

खानापूर तालुक्यात अंड्यांवरील १८ लाख कोंबड्या आहेत. दररोज १६ लाख अंड्यांचे उत्पादन होते. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (एनईसीसी) गेल्या पंधरा दिवसांपासून अंड्यांच्या दरात चढ-उतार करण्यास सुरवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वीचा पावणेसहा रुपयांचा दर आता ३.९० रुपयांवर घसरला आहे. प्रतिअंडे सध्या १.१० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

अंडी समन्वय समितीने उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत दर द्यावा, अशी दीर्घकाळापासूनची मागणी आहे. या तोट्यामुळे बँकांचे व्याज, मजुरांचे पगार, वीज बिल द्यायचे कसे, असा सवाल आहे.

अंड्यांचे दर कमी झाल्याने ७२ आठवड्यांच्या पुढील कोंबड्या व्यापारी कमी पैशांत खरेदी करू लागले आहेत. दीड किलोची कोंबडी ७५ ते ८० रुपयांना अशा कवडीमोल दराने व्यापारी मागत आहेत. एखाद्या पोल्ट्रीधारकाने थेट व्यापाऱ्याशी संपर्क केल्यास काही व्यापारी पोल्ट्रीधारकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

याचाही फटका पोल्ट्रीधारकाला बसत आहे. दुसरीकडे, अंड्याची किरकोळ विक्री ६ ते ७ रुपयांना होत आहे. अंड्याचा उत्पादनखर्च ४ रुपये २० पैसे आहे. त्यामानाने अंड्याला दर मात्र मिळत नाही अशी स्थिती आहे.

कोंबडी खाद्यातील मक्याचा दर क्विंटलला २३०० रुपये आहे. जो हमीभावापेक्षा तीनशे रुपयांनी अधिक आहे. दुसरीकडे अंडी दर कोसळले आहेत. अंडी समन्वय समितीतील काही बड्या मंडळींचे हे कारस्थान आहे. या समितीत शासनाने लक्ष घालावे. कंपन्यांमधील स्‍पर्धेचा फटका बसत आहे. आधारभूत किंमत निश्‍चित करूनच दिला पाहिजे. तो किमन सव्वापाच रुपये हवा.’’ - शत्रुघ्न जाधव, अंडी उत्पादक, विटा.

गतवर्षीही फेब्रुवारीत दर कमी झाले होते. दरातील घसरणीत ‘नेक’मधील कोणी आहेत, असा थेट आरोप करता येणार नाही. मात्र त्याचाही शोध घ्यायचा असेल तर अंडी शीतगृहात कोण पाठवतेय का, याची चौकशी करावी. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री अंड्याचे दर हैदराबाद येथून ठरविले जातात.

तेथून जो दर निघेल, त्या दराप्रमाणे पोल्ट्री व्यावसायिकांना घाऊकप्रमाणे अंडी विकावी लागतात. अंड्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत, हे खरेच आहे.

मात्र त्‍यावर उपाय म्हणजे शीतगृहाची सुविधा वाढवली पाहिजे. उत्पादकांनी शासनाच्या सवलतीचा लाभ घेऊन त्यासाठी पुढाकार घ्यावा. मार्केटमध्ये अंडी टंचाई ठेवून बाजारपेठेत स्वतः विक्रीकडे शेतकऱ्यांनी जायला हवे.

- डॉ. विनोद कुलकर्णी, पोल्‍ट्री व्यवसायातील तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT