sarpanch without honor three months 
कोल्हापूर

धक्कादायक ; गावचे कारभारीच आहेत मानधनाविना 

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर ) : राज्यातील सरपंचाचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.  या थकीत मानधनातूच मुख्यमंत्री निधीसाठी ४० टक्के कपातीची घोषणा सरकारने केली. त्यामुळे उर्वरित मानधन तरी मिळेल का? असा सवाल राज्यातील सरपंचांकडून होत आहे.
 

राज्यात सुमारे २८ ते ३० हजार ग्रामपंचायती आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. गावातील लोकसंख्येच्या आधारावर ही वाढ होती. सरासरी १२०० ते ३००० रुपये असे मानधनवाढीचे स्वरूप होते. मेळाव्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सरपंचांच्या खात्यात वाढीव मानधन जमा झाले. त्यानंतर पुढचे चार महिने ते मिळालेच नाही. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाला. सुरुवातीला काही महिने मानधन मिळाल्यानंतर पुन्हा ते थकले. मागील तीन महिन्यांपासून सरपंचांना मानधनाची प्रतीक्षा आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, करोनाची साथ आल्यावर राज्य सरकारने लोकप्रतिनिधींच्या मानधनातून ४० टक्के कपातीचा निर्णय घेतला. त्यात सरपंच, उपसरपंचांचाही समावेश आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. आता ४० टक्के कपात करून तरी उर्वरित मानधन द्या, अशी मागणी सरपंच संघटनांकडून होत आहे.

''मानधन नियमित मिळत नसून, गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.'' 

-शशिकांत खवरे, सरपंच, शिरोली पुलाची.

असे आहे सरपंच, उपसरपंचाचे मानधन 
२००० पर्यंत लोकसंख्या - सरपंच ३ हजार / उपसरपंच - १ हजार  
■ ८००० हजार पर्यंत लोकसंख्या - सरपंच ४ हजार / उपसरपंच - १ हजार ५००  
■ ८ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या - सरपंच ५ हजार / उपसरपंच - २ हजार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT