कोल्हापूर

सरुड वातावरण

CD

...अन्‌ सरूडमध्ये समर्थकांचा
अंतिम क्षणी काढता पाय
सरुड, ता. ४ : मतमोजणीपूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या सरुड (ता. शाहूवाडी) येथील शिव-शाहू महाविद्यालयाच्या परिसरातील कार्यालयात ८ पासूनच समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली. विजयाची खात्री घेऊन सायंकाळी ६ पर्यंत समर्थक थांबले होते. पोस्टल मताचा कल सुरुवातीला सरुडकरांच्या बाजूने आल्याने गर्दी जमली.
महाविद्यालयाच्या परीसरात स्वतः सत्यजित पाटील, वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील, भाऊ युवराज पाटील, विराज नाईक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, जि.प. सदस्य विजय बोरगे, आनंदराव भेंडसे व उपस्थित समर्थक तणाव, उत्सुकता, उत्कंठता आणि दबाव यांना फेरीअखेर सामोरे जात मतांची फेरीगणिक आकडेवारी जाणून घेत होते. पहिल्या फेरीत ७७ मतांची आघाडी मिळाल्याने धाकधूक वाढली. १४ व्या फेरीअखेर सरुडकरांचे लीड वाढत गेले तसे समर्थकांचा उत्साह वाढला.
१५ व्या फेरीनंतर धैर्यशील माने यांचे मताधिक्य वाढत गेले. तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हुरहूर दिसत होती. एक्झिट पोलनुसार बहुतांशी चॅनल आणि सर्‍व्‍हे एजन्सीने सत्यजित पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र प्रत्येकाला हुरहूर लागून राहिली होती. शेवटी अंतिम फेरीची आकडेवारी जाहीर होताच समर्थक खिन्न चेहऱ्याने घरी परतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT