self immolation attend by a lady in ichalkaranji kolhapur with the topic of cloth sellers 
कोल्हापूर

इचलकरंजीत महिलेचा आत्मदहनचा प्रयत्न ; कापड विक्रेत्यांच्या गाळ्यांचा वाद पेटला

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील फिल्टर हाऊसजवळील कापड विक्रेत्यांच्या गाळ्याचा वाद आज पून्हा पेटला. गाळे उभारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मनाई केली असता एका संतप्त महिलेने आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करीत महिलेकडील डिझेलचे कॅन काढून घेतले. या प्रकाराने घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला.

काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी पालिकेत आत्मदहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर आज पून्हा आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका व अग्नीशमन दलाची गाडी तातडीने तैनात करण्यात आली. या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जलशुध्दीकरण केंद्रलगतच्या भिंतीजीवळ पालिकेच्या मंजुरीनंतर मुव्हेबल गाळे उभारण्याचे काम कापड विक्रेत्यांकडून सुरु आहे. त्यातील आठ गाळे उभारण्यात आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने हे काम थांबविण्याचा आदेश दिला आहे. 

दोन दिवसांपूर्वी कापड विक्रेत्यांनी पालिकेत येवून या प्रश्‍नी मार्ग काढण्याची मागणी केली होती. पण मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी हे गाळे मुव्हेबल नसल्याचा दावा करीत गाळे उभारणीला मंजुरी नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, आज गाळे उभारण्यासाठी ट्रकातून साहित्य आले होते. गाळे उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. याची माहिती पालिका प्रशासनाला मिळाली. त्यानुसार मिळकत व्यवस्थापक सी. डी. पवार व अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळे या ठिकाणी आले. पवार यांनी गाळे उभारण्यास मंजुरी नसून काम थांबविण्याची सूचना केली. यावेळी गाळेधारक व त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक वादावादी झाली.

दरम्यान  कापड विक्रेत्यांच्यामधील एका वृध्द महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्यांच्याकडील डिझेलचे कॅन आपल्या ताब्यात घेतले. या प्रकारांने तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. कापड विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबातील महिला तेथे थांबून होत्या. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तासह आवश्यक सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT