Samarjit Ghatge vs Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

'100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी दलितांना दिलेली जमीन समरजित घाटगेंनी काढून घेतली'; मुश्रीफांचा गंभीर आरोप

Samarjit Ghatge vs Hasan Mushrif : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे.'

सकाळ डिजिटल टीम

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजित घाटगे यांनी काढून घेतली आहे.

म्हाकवे : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारतीय राज्यघटनेची फार मोठी देणगी देशाला दिली आहे. त्यामुळे चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान अबाधित राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

बाचणी (ता. कागल) येथे आयोजित संविधान सन्मान परिषदेत (Constitution Sanman Parishad) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाराम कांबळे यांचे नातू राजेंद्र कांबळे होते. त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. तर, बामणी येथील बौद्धविहार व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

मुश्रीफ म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. त्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार आणि मंत्री झाला.’ माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘कसलाही आणि कोणताही प्रसंग येऊ दे, कधीही कुणापुढेही झुकू नका. अलीकडच्या काळात चांगल्या कामात खोडा घालणाऱ्या काही दुष्ट प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. अशा प्रवृत्तींना तिथेच ठेचा.’

स्वागत भिकाजी सरदेसाई यांनी केले. यावेळी विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मनोज फराकटे, ‘बिद्री’चे संचालक रवींद्र पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, दिनकर कोतेकर, दलितमित्र बळवंतराव माने, संजय हेगडे, सुनील खामकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ यांनी केले. आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.

त्यांना जमिनी विकत घेऊन देऊ..

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजित घाटगे यांनी काढून घेतली आहे. याचा संदर्भ वक्त्यांनी भाषणात घेतला. हा धागा पकडत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘सिद्धनेर्ली येथील अन्यायग्रस्त दलित समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूच. प्रसंगी, दुसरी जमीन विकत घेऊन त्यांना जमिनी देऊ.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT