Kolhapur Assembly Election esakal
कोल्हापूर

Kolhapur Election : 'कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 'या' सहा जागा शरद पवार गट लढविणार'

सकाळ डिजिटल टीम

‘राष्ट्रवादी’च्या पारंपरिक ‘चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल या मतदारसंघांसह कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी मतदारसंघांत पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात येणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर अथवा दक्षिण अशा विधानसभेच्या (Kolhapur Assembly Election) सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP) लढविणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.

पक्षातर्फे ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या मोहिमेत सहभागी होऊन ऑनलाइन लिंकद्वारे मत नोंदवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या माहितीसाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

‘राष्ट्रवादी’च्या पारंपरिक ‘चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल या मतदारसंघांसह कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी मतदारसंघांत पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकदेखील पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा आणि उमेदवार कोणीही असो, पण आमदार पक्षाचाच झाला पाहिजे,’ असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचे पोवार यांनी सांगितले.

Kolhapur Assembly Election

यावेळी सरचिटणीस सुनील देसाई यांनी प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, रामराज कुपेकर, निरंजन कदम, रावसाहेब भिलवडे, शिवानंद माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गणेश जाधव, आप्पा हजारे, मकरंद जोंधळे, मुसाभाई कुलकर्णी, नितीन मस्के, नागेश परांडे, नागेश शिंदे, महादेव पाटील, फिरोज खान, गणेश नलवडे, सायली महाडिक आदी उपस्थित होते.

तीन जागा वाढवून मागणार

‘लोकसभेचे सध्या अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यानंतर लगेच जिल्ह्यातील प्रमुख ६० पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. लोकसभेची कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली. आता विधानसभेला आपल्या पक्षाला जिल्ह्यातील तीन जागा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी पक्षाध्यक्षांकडे केली जाणार असल्याचे अनिल घाटगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT