ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आपला सोबत अचानक निघून गेल्याने मित्रांना अश्रु अनावर झाले
कडगाव : रांगणा किल्ल्यावर गडस्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील ओमकार भीमराव पाटील (वय २८) हा तळ्यात बुडाला आहे. युद्धपातळीवर त्याचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. भुदरगड (Bhudargad) पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, किल्ले रांगणा येथे बत्तीस शिराळा येथून चाळीस तरुण गडस्वच्छता व शिवज्योत आणण्यासाटी आले होते. यावेळी ओमकार तेथील तळ्यात बुडाला. त्याचा शोध घेण्याचे काम आपत्कालीन व्यवस्थापनच्या मदतीने सुरू आहे. (Rangana Fort)
दरम्यान, घनदाट जंगलातून पोलिस व आपत्कालीन व्यवस्थापन यांच्यावतीने अकसा लाईट किल्ल्यावर पोहोचवण्यात आली असून मोटर बोट गडावर चढवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. (Police) पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पाटील, विनोद दबडे, बाबासाहेब परीट तपास करीत आहेत.
ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आपला सोबत अचानक निघून गेल्याने मित्रांना अश्रु अनावर झाले आहेत. शिवजयंती निमित्त सर्व मित्रमंडळ रांगणा किल्ल्यावर शिवज्योत आणण्यासाठी गेले होते. मात्र सोबत येणारा ओमकार हा घरी जाताना आपल्यासोबत नसणार या कल्पनेने त्यांना गहिवरून आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.