कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे मंगळावारी आयोजित केलेल्या मॉक टेस्टच्या तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. त्यामुळे ही टेस्ट देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची आज सकाळी दहा ते अकरा या दरम्यान टेस्ट होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली होती.
परीक्षा विभागाने मंगळवारी दुपारी साडे बारा ते अडीच दरम्यान मॉक टेस्टचे आयोजन केले होते. मात्र, टेस्टमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देता आली नाही. यावेली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषेतील पेपर आले असल्याची तक्रार विभागाकडे केली आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला समोरे जावे लागले. विद्यार्थ्यांनी त्याबाबतच्या तक्रारी थेट महाविद्यालयाकडे केल्या. त्याची दखल परीक्षा विभागाला घ्यावी लागली. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट देता आली नाही, त्यांच्याकरिता आज ती घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आजही ती परीक्षा घेण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यासाठीचा यूजर आयडी व पासवर्ड विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी https://suk.brainzorg.com लिंकवर जाऊन “Get Your Password" हा पर्याय निवडून पासवर्ड उपलब्ध करून घेता येईल. तांत्रिक अडचणीसाठी विद्यापीठाच्या कॉल सेंटर / हेल्प लाईन क्रमांक ८९८०००१२४९ यावर संपर्क साधावा. तरी मुख्य परीक्षेमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडील परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देणे बंधनकारक आहे, याची नोंद सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन श्री. पळसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.