राज्यात जी राजकीय उलथापालथ झाली ती सगळी निवडणुकीनंतर झाली आहे.
कोल्हापूर : राज्यातील लोकसभेच्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चर्चा होऊन त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सांगितले जाईल. शिवसेनेचे (Shiv Sena) १८ विद्यमान खासदार आहेत. आणखी काही जागा अशा एकूण लोकसभेच्या (Loksabha Election) २५ जागा शिवसेना लढवेल, असा दावा शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला.
‘होऊन जाऊ दे चर्चा’ या उपक्रमांतर्गत ते कोल्हापुरात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘कोल्हापूर जिल्ह्यात आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवरही आमचा दावा कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.
जाधव म्हणाले, ‘राज्यात जी राजकीय उलथापालथ झाली ती सगळी निवडणुकीनंतर झाली आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्याचा विचार होणार नाही. ज्या ठिकाणी ज्यांचे खासदार आहेत त्या जागा सोडून उर्वरित जागांसाठी महाविकास आघाडीची बैठक होईल.
प्रत्येक पक्षाकडे असणारे संभाव्य उमेदवार, जिल्ह्यातील पक्षाची ताकद या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यानंतर अंतिम जागा वाटप ठरेल. शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. चर्चेअंती आणखी काही जागा शिवसेनेला मिळतील. राज्यातील एकूण लोकसभा जागांपैकी २५ ठिकाणी शिवसेना आपले उमेदवार उभे करेल.’
जाधव पुढे म्हणाले, ‘ भाजपने केलेल्या घोषणा ‘चुनावी जुमले’ ठरल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे. दोन पक्षातील आमदार चोरून भाजपने राज्यात सत्ता आणली. मात्र, त्यांना राज्यकारभार करता आलेला नाही. शेतकरी, कामगार सर्वच दुःखी आहेत. रस्त्यांवरील खड्डे, मुंबई-गोवा महामार्ग हे प्रश्न प्रलंबित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अजित पवार शिवसैनिकांना निधी देत नाहीत. हे कारण देऊन आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेतील आमदार भाजपसोबत गेले. आता ज्या अजित पवारांना नावे ठेवली त्यांच्या सोबतच सत्तेत राहायची वेळ आली. त्यामुळे आता सरवणकरांना आरोप करायला काही उरले नाही. म्हणून ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करत आहेत. सरवणकर पूर्वीचे आरोप विसरले आहेत,’ अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
‘भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका करतात. मग मी फडणवीसांवर टीका केली की ते माझ्यावर चिडतात. त्यांना वेस्ट इंडिजच्या क्रिकेट खेळाडूची उपमा दिली की राग येतो,’ अशी कोपरखळीही जाधव यांनी यावेळी मारली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.