Shivsena Mahaadhiveshan Kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात आजपासून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन, अर्धा डझन मंत्री-नेत्यांची उपस्थिती; शहरात उभारले 100 होर्डिंग्ज, 700 फलक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज व उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये अधिवेशन होत आहे. आज (ता. १६) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‍‍घाटन होणार आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज व उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे (शिंदे गट) पहिलेच राष्ट्रीय महाअधिवेशन (Shivsena Mahaadhiveshan) होत आहे. यासाठी जवळपास अर्धा डझन मंत्री व नेते उपस्थित राहणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सुमारे ४० स्वागत कमानी, १०० होर्डिंग्ज, ७०० फलक उभारले आहेत. चौका-चौकात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये अधिवेशन होत आहे. आज (ता. १६) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‍‍घाटन होणार आहे. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यासह खासदार, आमदार, नेते उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनातील पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत संघटनात्मक विषयावर चर्चा, दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० यावेळेत राजकीय विषयावर चर्चा, तिसऱ्या सत्रात सायंकाळी ६ वाजता सरकारी योजना कार्यशाळा आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन, सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० यावेळेत निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण, दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होईल.

यानंतर सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, अधिवेशनासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात नेते- पदाधिकारी येणार असल्याने शहरासह परिसरातील सर्वच हॉटेल्स बुक करून निवास व्यवस्था केली आहे. येथून त्यांना अधिवेशन ठिकाणी जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्थाही आहे.

विमानतळावर लगबग

दरम्यान, अधिवेशनासाठी काल (गुरुवार) शिंदे गटाच्या मंत्र्यांसह अनेक नेते कोल्हापुरात रात्री दाखल झाले. दरम्यान, सायंकाळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचेही विमानतळावर आगमन झाले. सायंकाळनंतर विमानतळावर एकच लगबग होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT