षष्ठी यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. भाविक उपवास करून येतात व उपवास दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांच्या घरी सोडतात.
जोतिबा डोंगर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘महादेव काळभैरव श्री यमाई देवी व आदिमाया चोपडाईदेवीच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील आदिमाया चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेसाठी (Shravan Shashti Yatra) महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश गुजरात या राज्यातून तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली.
त्यामुळे श्रावण षष्ठी यात्रेला चैत्र यात्रेचे स्वरूप (Jyotiba Dongar) आले. तब्बल पंधरा वर्षानंतर यंदा षष्ठी यात्रेला कडक उन्हाचा तडाखा बसला. यात्रेत मुंबई, पुणे, सातारा, बेळगांव या भागातील भाविकांनी गर्दी केली. रात्रभर डोंगरावर भाविक येत राहिले. बुधवारी (ता.२३) सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होणार आहे.
षष्ठी यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. भाविक उपवास करून येतात व उपवास दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांच्या घरी सोडतात. मंदिराभोवती भाविकांच्या रात्रभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री आठनंतर डोंगरावर गर्दी झाली. पुजारी लोकांची घरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली.
दरम्यान, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत दुपारनंतर डोंगरावर तळ ठोकून होते. त्यांनी सर्वत्र बंदोबस्ताची पाहाणी केली. आज डोंगरावर कडक पोलिस बंदोबस्त होता. मंदिर परिसराला तर छावणीचे स्वरूप आले होते. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे - जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर.
तसेच देवस्थानचे सचिव प्रशांत बनसोडे, अधीक्षक धैर्यशील तिवले, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार डोईजड, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे तसेच सर्व विभागांचे अधिकारी डोंगरावर तळ ठोकून होते. श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील महापूजा बांधण्यात आली तर आदिमाया चोपडाई देवीची वैशिष्ट्यपूर्ण अशी महापूजा बांधण्यात आली.
श्रावणषष्टी यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण जोतिबा डोंगर जागा होता. भाविकांसाठी मोठी स्क्रीन लावून मुखदर्शनाची सोय केली होती. डोंगरावरील महिलांची रात्रभर पुरणपोळी करण्याची लगबग सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.