Silver Businessman Brahmanath Halonde Murder esakal
कोल्हापूर

Kolhapur : चांदी उद्योजकाचा हुपरीत निर्घृण खून; छातीत धारदार शस्राने वार, खुनानंतर 25 किलो चांदीचे दागिने गायब

सकाळ डिजिटल टीम

ब्रह्मनाथ बीबीए व एमबीए पदवीधर होते. ते अविवाहित व कुटुंबात थोरले होते. त्यांना एक लहान भाऊ व बहीण असून, ते दोघेही विवाहित आहेत.

हुपरी : येथील तरुण चांदी उद्योजक ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन, हुपरी) यांचा धारदार शस्राने छातीत तीन ते चार जोरदार वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. पंचतारांकित एमआयडीसीमधील सिल्व्हर झोनमध्ये रविवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत (Gokul Shirgaon Police) झाली आहे.

दरम्यान, ब्रह्मनाथ हालोंडे (Silver Businessman Brahmanath Halonde Murder) यांच्या चांदी दुकानातील लोखंडी कपाट उघडे असल्याचे व त्यामधील सुमारे २५ किलो चांदी दागिन्यांचा माल गायब झाला असल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने की आणखी कोणत्या कारणातून, याचे रहस्य निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चांदी उद्योजकांत घबराट निर्माण झाली आहे.

पोलिस तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ब्रह्मनाथ हालोंडे हे आई-वडिलांसह सिल्व्हर झोनमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. तिथेच वडिलांबरोबर त्यांचे स्वतःचे हिरा ज्वेलर्स या नावाने चांदीचे दागिने विक्रीची स्वतंत्र फर्म आहे. ते देशभरातील ठिकठिकाणी पेठांमध्ये जाऊन ते व्यवसाय करीत असत.

ब्रह्मनाथ यांचे आई व वडील शुक्रवारी (ता. २२) सकाळी मूळ गावी जैनवाडी (ता. चिक्कोडी) येथे शेतीच्या कामासाठी गेले होते. ब्रह्मनाथ एकटेच घरी होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे आई-वडिलांशी फोनवरून बोलणे झाले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आई-वडील घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. आत प्रवेश करताच त्यांना ब्रह्मनाथ हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच हुपरीचे पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, गोकुळ शिरगावचे दिगंबर गायकवाड, शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, आदी अधिकारी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी हल्लेखोरांनी ब्रह्मनाथ यांच्या डाव्या तसेच उजव्या बाजूला छातीत, दंडावर तीन ते चार ठिकाणी धारधार शस्र खुपसल्याचे आढळून आले आहे. बरगड्यांतून आरपार वार गेल्याने तीव्र रक्तस्राव होऊन ते जागीच गतप्राण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनातील हत्यार आढळून आलेले नाही.

ब्रह्मनाथ बीबीए व एमबीए पदवीधर होते. ते अविवाहित व कुटुंबात थोरले होते. त्यांना एक लहान भाऊ व बहीण असून, ते दोघेही विवाहित आहेत. त्यांच्या भावाचा हुपरी गावात चांदी व्यवसाय आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून, दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

पंचवीस किलो चांदीचे दागिने गायब

ब्रह्मनाथ हे रविवारी सकाळी बाराच्या सुमारास यळगूड येथे आयोजित जैन धर्मीयांच्या चातुर्मास पूजेसाठी गेल्याचे अनेकांनी पाहिल्याची चर्चा सुरू होती. त्यावरून त्यांचा खून काल दुपारनंतर झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ब्रह्मनाथ हे किचन जवळच्या खोलीत मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर लगतच्या दुकानातील दोन पैकी एक लोखंडी तिजोरी उघडी होती. वडील सुकुमार यांच्या म्हणण्यानुसार तिजोरीतील सुमारे पंचवीस किलो चांदीचे दागिने गायब झाले आहेत. खून कोणी व का केला, याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Assembly Elections: विधानसभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT