Drugs in kolhapur sakal
कोल्हापूर

Drugs in kolhapur : नाव ‘राजा’, विकतोय गांजा;रंकाळा स्टँड परिसरात चलती,‘धावते’ रॅकेट मोडण्याचे आव्हान

नावाने ‘राजा’ असल्यामुळे त्यालाही ऐशआरामात जगण्याची तशी हौस आहे. शिक्षण नाही, नोकरी नाही मग तो ‘राजा’ कसा ठरणार. त्याने जवळचा मार्ग निवडला गांजा विकायचा. रंकाळा स्टँड परिसरात बसून त्याचा गांजा विक्रीचा धंदा आज जोमात सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : नावाने ‘राजा’ असल्यामुळे त्यालाही ऐशआरामात जगण्याची तशी हौस आहे. शिक्षण नाही, नोकरी नाही मग तो ‘राजा’ कसा ठरणार. त्याने जवळचा मार्ग निवडला गांजा विकायचा. रंकाळा स्टँड परिसरात बसून त्याचा गांजा विक्रीचा धंदा आज जोमात सुरू आहे. एक रिक्षा येते राजाला पुड्या देते, पुढे निघून जाते, ही रिक्षा सध्या तरी रंकाळा, गंगावेस परिसरात फिरत असली तरी कोणाच्याही नजरेत न येता गांजा विक्रीचे धावते रॅकेटच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या नव्हे, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गांजाचा छुपा बाजार जोमात सुरू आहे. यावर वचक घालण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.

गोगो, रिजला पेपरची गुंडाळी

‘गोगो’ म्हणजेच सिगार सारखा एक रोल बाजारात उपलब्ध होतो. त्यामध्ये गांजा भरून त्याचे तीन झुरके शंभर रुपयात देणारेही काहीजण आहेत, तर दहा रुपयांत मिळणाऱ्या रिजला पेपरची गुंडाळी करून त्यात उंची तंबाखू, गांजा भरून त्याचे झुरके घेणारे घोळके वाढले आहेत.

ई सिगारचा खुला बाजार

अनेक जण ई-सिगारकडे आकर्षित होताहेत. ई-सिगार ऑनलाइन खरेदी करता येत असल्याने त्यावर नियंत्रण

ठेवणे अशक्य बनले आहे.

  • हुक्का कोणत्याही पानपट्टीत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध केला जातो. त्यातूनच खऱ्या अर्थाने या व्यसनाची सवय जडत जाते.

  • कदमवाडी मैदानात ‘अज्या, पप्प्या’चे दुकान

  • कदमवाडीच्या तळी मैदानावर अज्या आणि पप्प्याचा गांजा विक्रीचा धंदा जोमात आहे. केवळ वयस्कर नाही, तर १८ वय वर्षेही पूर्ण न झालेली अनेक मुले रात्री या धुंदीत तळी मैदानावर पडलेली पाहायला मिळतात. स्थानिक नागरिकांनी अनेकदा सूचना करूनही याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

म्हणे, पोलिसांना माहीतच नाही

रंकाळा व गंगावेश परिसरात गांजा विक्रीसाठी फिरणारी ही रिक्षा सर्वपरिचित आहे. तसेच, कदमवाडी येथील तळी मैदानातही या गांजाची झिंग होऊन पहुडलेली तरुणाई स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येते. मग याची माहिती पोलिसांना मिळत नाही हे म्हणजे हास्यास्पदच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

‘त्या’ फिरत्या रिक्षाला ब्रेक लावा...

रंकाळा, गंगावेस भागात फिरणाऱ्या रिक्षाचा बंदोबस्त व्हावा, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली. गांजा विक्रीची माहिती कळविल्यास जागा बदलण्यास सोपे जावे म्हणून या ‘पठ्ठ्या’ने फिरत्या रिक्षाचा आधार घेतला आहे. तरुणांची व्यसनाधीनता रोखायला ‘त्या’ रिक्षाला ब्रेक लावायला हवा, अशी अपेक्षा स्थानिक त्रस्त नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT