गांधीनगर ( कोल्हापूर ) : जेवणातील भाजी चांगली झाली नाही. या किरकोळ कारणावरून करवीर तालुक्यातील इंद्रजित कॉलनी येथे जन्मदात्या बापाचा मुलाने खून केल्याची घटना मनेर मळ्यात आज दुपारी घडली. चंद्रकांत भगवान सोनवले (वय- ५२ वर्षे मूळ गाव भिलवडी जि. सांगली) असे मृताचे नाव असून मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनवले (वय-२० वर्षे) याने त्यांचा खून केला आहे. वडिल जेवत असताना वाद झाल्यानंतर वडिलांनी मुलाला तांब्या फेकून मारला. त्यानंतर मुलगा आपल्या डोक्यावरील केस कटिंग करत होता त्याच कात्रीने वडिलांच्या छातीत कात्री खुपसली. यामध्ये वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गांधीनगर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रकात भगवान सोनवले व मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकात सोनवले हे दोघे व वृद्ध आजी घरी असताना किरकोळ कारणावरून बापलेकाची भांडणे झाली. त्यानंतर बापाने मुलग्याला दोन मुस्काडीत मारल्याचा राग मुलग्याला सहन झाला नाही. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात मुलग्याने बापावर केस कटिंग करणाऱ्या कात्रीने वार केला. त्याच जखमी अवस्थेत चंद्रकांत सोनवले यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषित केले. दरम्यान गांधीनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले.
त्यांनी सदर घटनेचा पंचनामा करून पुन्हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवला. घटना घडली तेव्हा चंद्रकांत सोनवले याची पत्नी कमल चंद्रकांत सोनवले ह्या कामावर गेल्या होत्या. तर बहीण प्राजक्ता ही तांदळाचे पैसे देण्यासाठी दुकानात गेल्या होत्या. घरी आजी होत्या त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. चंद्रकांत हे पेंटर व गवंडी काम करत होते तर मुलगा ही त्याच्या हाताखाली पेंटर काम करत होता. मूळ भिलवडी गावचे रहिवाशी असलेले हे कुटूंब रोजगार निमित्त उचगाव मनेर मळ्यात गेली वीस वर्षे भाडेत्त्वावर खोली घेऊन राहत होते.
हेही वाचा - नोकरीचे अमिष दाखवून केली तीन लाखांची फसवणूक
पाच लोकांच्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतआहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, गांधीनगर पोलीस कर्मचारी मोहन गवळी, आकाश पाटील, राजेश चव्हाण, महादेव माने उपस्थित होते.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.