special story of four wheeler cars in kolhapur chandgad MLA rajesh patil story for today 
कोल्हापूर

राजेश पाटील यांची ७०७७ चंदगडकरांसाठी जणू सुगंधी अत्तर

संदीप खांडेकर

कोल्हापूर : नरसिंग गुरुनाथ पाटील चंदगडचे माजी आमदार. चंदगड तालुक्‍यातील म्हाळेवाडी त्यांचे गाव. गावातल्या प्राथमिक शाळेत त्यांनी धडे गिरवले. बेळगावच्या सेंट पॉल कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. सरपंच ते आमदार हा त्यांचा राजकीय प्रवास. ग्रामीण भागातल्या समस्यांची उत्तम जाण, हे त्यांचे वैशिष्ट्य. ते आज हयात नाहीत. त्यांच्या स्मृती चंदगडकरांच्या डोक्‍यातून जाणे अशक्‍यच. तसाच त्यांच्या गाडीचा ७०७७ नंबरही. त्यांचा मुलगा राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत. राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून त्यांना मिळाले. त्यांच्या गाडीचा नंबरही वडिलांच्या स्मृती जाग्या करणारा आहे. या नंबरवर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. 

नरसिंग पाटील यांचे वडील गुरुनाथ हे शिक्षक. ‘गुरुजी’ म्हणून त्यांचा पंचक्रोशीत आदरयुक्त दबदबा होता. मुलाच्या शिक्षणात त्यांनी कसूर केली नाही. गावातल्या प्राथमिक शाळेनंतर नरसिंग पाटील बेळगावच्या सेंट पॉलचे विद्यार्थी झाले. घराण्याला राजकीय वारसा नव्हता. नेतृत्वातील त्यांची हातोटी विलक्षण होती. गावचे सरपंच झाल्यानंतर तिला धार आली. ते १९६० मध्ये पंचायत समितीचे सभापती झाले.

जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाचा मानही त्यांना मिळाला. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. ते १९९० मध्ये आमदार झाले. त्यांचा जनसंपर्क दांडगा. मतदारांनी त्यांच्या अंगावर गुलाल उधळला. पुन्हा त्यांना १९९९च्या निवडणुकीत आमदारकीची संधी मिळाली. पुढे २००२ मध्ये त्यांनी चारचाकीची खरेदी केली. तिचा नंबर ७०७७ असा घेतला. कित्येक किलोमीटरचा प्रवास गाडीने अनुभवला. ती बदलून दुसरी चारचाकी गाडी त्यांच्या घरात आली. तिचा नवा नंबर असण्याची शक्‍यताच नव्हती. पूर्वीच्याच नंबरची प्लेट गाडीवर झळकली. 

दौलत सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. कारखान्यावरच्या कामगारांना त्यांच्या गाडीचा नंबर तोंडपाठ झाला. त्यांच्या गाडीचा नंबर मतदारांच्याही डोक्‍यात बसला. केडीसीसी, राज्य साखर संघाचे ते संचालक. दौऱ्यानिमित्त राज्यभरात त्यांचा प्रवास ठरलेला होता. चारचाकीशिवाय करणे तो त्यांना शक्‍यही नव्हते. नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातही नंबरचे अस्तित्व आकाराला आले.

मुलगा राजेश पाटील यांनी गाडीसाठी दुसऱ्या नंबरचा विचार केला नाही. वडिलांप्रमाणेच त्यांचे शिक्षण बेळगावला झाले. ते बी.कॉम. पदवीधर. त्यांनी कायद्याचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. गोकुळ व केडीसीसीचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. चंदगड खरेदी विक्री संघाचे चेअरमनपद त्यांच्याकडे आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे नशीब चमकले. आमदार म्हणून चंदगड मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करत आहेत. गावागावातल्या विकासकामांसाठी त्यांचा दौरा सुरू आहे. त्यांची गाडी त्याकरिता विशेष ओळख ठरली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT