special story of ganeshmurti sculpture in kolhapur 
कोल्हापूर

गणेशमुर्तीत जिवंतपणा आणणारा अवलिया !

स्नेहल कदम

कोल्हापूर : कोणत्याही पद्धतीच्या साचा किंवा मोल्डचा वापर न करता आपल्याला जशी हवी तशी गणरायाची मूर्ती तो स्वत:च्या हातांनी बनवतो. मूर्तीत जीवंतपणा यावा आणि उठावदार मूर्ती तयार करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावचा अजित साळवी हा मूर्तीकार. इकोफ्रेंडली मूर्ती बनवणार हा मूर्तीकार मागील पाच ते सहा वर्षापासून हे काम करत आहे.

पारंपरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसह वेगळ्या अॅंटीक मूर्ती तयार करण्यावर त्याचा भर आहे. 'बॉम्बे क्ले' म्हणजेच पांढऱ्या शाडूच्या मातीपासून या मूर्ती तो बनवतो. ही माती मुंबई परिसरात आढळते. पांढऱ्या रंगाची ही माती अर्धा ते पाऊण तसाच्या आत पाण्यात विरघळते आणि साधारण त्या मातीचा आपण सात वेळा पुनर्वापार करू शकतो. म्हणजे पुढील सात वर्ष त्याच मातीपासून गणेशमूर्ती बनवता येते. 

मूर्तीची ऊंची एक ते दीड फुटापर्यंत असते. तडे जाऊ नयेत म्हणून यामध्ये कापसाचा वापर केला जातो. वारसा हक्काने   अजित कुंभार आहे. परंतु, त्याच्या कुटुंबात कोणी मूर्तिकार नाही. मात्र शिल्पकलेची कोणतीच पार्श्वभूमी नसणाऱ्या या मूर्तीकाराकडे आज नवीन पारंपरिक मूर्तींचा खजिना आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आधी त्या मूर्तीचे स्केच, मेजरमेंटचा अभ्यास करून मगच मूर्ती तयार करावी लागते. 

हातावरच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधने तो स्वत: तयार करतो. आपल्याकडे मिळणारी लाल शाडू माती आणि मुंबईत मिळणारी पांढरी शाडू माती अशा दोन्ही मातींच्या मूर्त्यांना मागणी आहे. मात्र एकदा वापरलेल्या लाल मातीचा पुन्हा म्हणावा तसा उपयोग होत नाही. इकोफ्रेंडली गणपती आणि त्याला साजेसा देखावा कसा असावा याचीही कल्पना तो ग्राहकांना देतो. आपल्याला हवी तशी मूर्ती मिळावी अशी प्रत्येक गणेशभक्ताची इच्छा असते. मात्र अनेकांना यासोबत तडजोत करावी लागते. मात्र अशा नवोदित मूर्तीकारांमुळे ग्राहकांनाही मूर्ती निवडीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. 

अजितच्या या कलेला जिल्ह्या बाहेरूनही मागणी आहे. मात्र ज्या ग्राहकाने मागणी केली आहे तिथे ही शाडूची अॅंटीक मूर्ती सुखरूप पोहचेल का, याबाबत थोडी शंका आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक हौशी गणेशभक्त अगदी दिवाळीपासूनच त्याच्याकडे मूर्तिचा फोटो आणि एक पाट देऊन जातात. सुटसुटीत, इकोफ्रेंडली, पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणारा कलाकार दरवर्षी मोजक्याच मूर्ती तयार करतो. गणेश चतुर्थीच्या अगदी आदल्या दिवशी तो मूर्तींचे रंगकाम करतो. शक्य तेवढा जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो. 

''खूप कमी तरुणवर्ग या व्यवसायकडे वळतो. याकडे करियर म्हणून न पाहता फक्त सीझनसाठी यावर काम करतो. परिसरात असे बरेच कारागीर आहेत जे अशा मूर्ती बनवतात. मात्र साच्याचा वापर न करता हाताने मूर्ती बनवणारे खूप कमी आहेत. हाताने तयार केलेल्या मूर्तीत तो जीवंतपणा किंवा जे भाव दाखवता येतात ते साचात बनवलेल्या मूर्तीत दिसत नाहीत."

-अजित साळवी (मूर्तिकार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT