ST Sarkar gang chief Sanjay Telnade esakal
कोल्हापूर

मोठी बातमी! एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे काँग्रेस कमिटीत; 'त्या' व्हिडिओनंतर पोलिसांकडून कारवाई सुरू

रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एका नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिस जागे झाले.

सकाळ डिजिटल टीम

हद्दपारीच्या ठिकाणाहून तेलनाडे याने काही दिवसांपूर्वी शहराशी जोडत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो ऑनलाईनरीत्या शहरात येण्याचा प्रयत्न करत होता.

कोल्हापूर : जिल्ह्यातून हद्दपार झालेला एसटी सरकार गँगचा (ST Sarkar Gang) म्होरक्या संजय तेलनाडे (Sanjay Telnade) बुधवारी (ता. ३) खटल्याच्या साक्षीसाठी शहरात आला आणि बिनधास्तपणे सर्वत्र वावरला. दुपारच्या सत्रात त्याने काँग्रेस कमिटीत सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर तो महापालिकेतही आणि इतर विविध कार्यक्रमांत बराच काळ वावरत होता.

रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एका नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिस जागे झाले. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्याची कार्यवाही पोलिसांनी (Kolhapur Police) सुरू केली. काही दिवसांपूर्वी एसटी सरकार गँगवर एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये म्होरक्या संजय तेलनाडे याचा समावेश आहे.

बुधवारी (ता. ३) त्याला न्यायालयात एका गंभीर गुन्ह्यांतील खटल्यात हजर राहण्यासाठी समन्स प्राप्त झाले होते. त्यानुसार हद्दपारीच्या अनुषंगाने न्यायालयात संबंधित खटल्याची साक्ष देऊन नियोजित हद्दपारीच्या ठिकाणी त्वरित जाणे त्याला बंधनकारक होते. मात्र, तेलनाडे हा काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमात गेला. यावेळी निवडणूक कालावधीत मदत केलेले महविकास आघाडीतील घटक पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात नेत्यांच्या पहिल्या रांगेत तो बराच काळ बसून होता. त्याने जोरदार राजकीय भाषणही केले. रात्री महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेलनाडे याने हद्दपार कारवाईच्या अटी व नियमांचा भंग करून कार्यक्रमात प्रवेश केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्याची दखल घेत गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याबाबत पुढील कारवाई करण्याचे लेखीपत्र शिवाजीनगर पोलिस ठाण्याला दिले आहे.

फेसबुक लाईव्ह आणि आता शहरात वावर

हद्दपारीच्या ठिकाणाहून तेलनाडे याने काही दिवसांपूर्वी शहराशी जोडत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो ऑनलाईनरीत्या शहरात येण्याचा प्रयत्न करत होता. खटल्याची साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष शहरात आला. मात्र, तसाच परत न जाता तो शहरभर वावरला. लपून छपून नाही तर तो थेटपणे सर्वत्र पोलिसांसमोरच फिरला.

याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला जाणार असून, त्यानुसारच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे.

-समीरसिंह साळवे, पोलिस उपाधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT