ichalkaranji sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनस्थळी मृत्यू

इचलकरंजीतील शहापूर आगारात घटना

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा आज उपोषणस्थळीच जागीच मृत्यू झाला. शरण्णाप्पा गिरमल्लाप्पा मुंजाळे (वय ३१, सध्या रा. लिंबू चौक, मूळ रा. अक्कलकोट) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने आयजीएम रुग्णालयात(IGM HOSPITAl) दाखल केले, मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका (heart attack)आल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यशासन आणखी किती जणांचा बळी घेणार, असा सवाल संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. घटना समजताच रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (ST worker dies at agitation in ichhalkaranji shahapur bus depo)

मुंजाळे तीन वर्षांपूर्वी इचलकरंजी आगारात बदली होऊन आले. ते वाहक होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. लढ्यात सर्व कर्मचाऱ्यांबरोबर तेही सहभागी होते. इचलकरंजी आगारात शहापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. तेथेच मुंजाळे यांना दुपारी तीनच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित आयजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हे समजताच मंजुळे यांचे सासरे बेशुद्ध होऊन जागीच कोसळले.

या घटनेनंतर एसटी कर्मचारी आयजीएम रुग्णालयात एकटवले. राज्य शासनाविरोधात आक्रमक होत मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर धडकला. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढत शवविच्छेदनानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी हमी देईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास मृताच्या नातेवाइकांनी नकार दिला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईक अक्कलकोटकडे रवाना झाले. संबंधितांवर कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.मुंजाळे यांना इचलकरंजी आगाराने कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस पाच जानेवारीला बजावली होती. यामुळे मुंजाळे तणावाखाली होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

हुंदके, हंबरडा अन् निषेधही

आगारातील तरुण सहकाऱ्याचा डोळ्यांदेखत झालेला मृत्यू एसटी कर्मचाऱ्यांच्या जिव्हारी लागला. आयजीएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कोणी रडत होते, कोणी हंबरडा फोडत होते, तर कुणी हुंदके देत राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त करत निषेध करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT