कोल्हापूर

Video - शववाहिका चालकांची जिवावर बाजी; कोरोना मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची शर्थ

दिवसरात्र काम; पीपीई किट घालून गाडी हॉस्पिटलकडे

संदीप खांडेकर

कोल्हापूर : 'शववाहिका चालविण्याचं काम कोणीतरी करायला पाहिजे, सगळेच हे काम नको म्हणाले तर कसं चालेल. माझे पती विनोद गवळी (vinod gavli) तीन वर्षांपासून शववाहिकेवर (ambulance) चालक आहेत. वर्षभर ते कोविड मृतदेह शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत (burning ground) पोचवण्याचे काम करतात. त्यांच्या कामाची सुरवातीला भीती वाटली. त्यापेक्षा त्यांनी हे काम सोडून द्यावे, असेच विचार होते. आता मात्र त्यांचे काम किती लाखमोलाचे आहे, याची खात्री पटली आहे आणि मनातील भीतीही गेली आहे," जाधववाडीतल्या मंगल गवळी सांगत होत्या. त्यांचे पती विनोद चालक म्हणून किती चांगलं काम करत आहेत, याची प्रचिती त्यांच्या बोलण्यातून येत होती.

गवळी यांच शिक्षण दहावीपर्यंत. (10 th standard) आई शारदा, वडील शरद यांच्याप्रमाणे पत्नी मंगल, बारावीत शिकणारी मुलगी सेजल, सातवीत असणाऱ्या सतेजची काळजी घेण्यात ते कमी नाहीत. ते भागात ‘बापू टेलर,’ म्हणून परिचित आहेत. फावल्या वेळेत ते कपडे शिवण्याचे काम करतात. ड्यूटीवर गेल्यावर रुग्णालयातून कोविड मृतदेह नेण्याची वर्दी येते. लगेच पीपीई किट घालून विनोद गाडी हॉस्पिटलकडे (hospital) नेतात. दिवसभरात १० मृतदेह स्मशानभूमीत पोचविण्याचे काम ते करतात.

"कोविडची (covid-19) पहिली वर्दी आली अ‌न काळजात चर्रर झालं. रोगाबद्दल फारशी माहिती नसली तरी ऐकूनच घाम फुटायचा. संसर्ग झाला तर कुटुंबीयांनी काय करायचे, असले विचार डोक्यात यायचे. कामावरच्या अधिकाऱ्यांसह फॅमिली डॉक्टर यांनी धीर दिला. पीपीई किट (PPE kit) घालून शववाहिका चालवण्यास सज्ज झालो. आधी तिघेच या कामासाठी नियुक्त होतो. आता प्रत्येक चालकाकडे ही जबाबदारी आहे. प्रत्येक जण न घाबरता हे काम करत आहे, गवळी यांनी सांगितले.

‘‘घरी आलो की कपडे सॅनिटाईज (sanitise) करून बादलीत ठेवतो. पत्नीने मी येण्यापूर्वी दारात पाणी तापवून ठेवलेले असते. अंघोळ करून घरात प्रवेश करतो. कोविडच्या मृतदेहाचे रॅपिंग योग्य झाले आहे का?, हे तपासावे लागते. त्यामुळे घरी येताना काळजी घ्यावी लागते. आई-वडील तळमजल्यावरील खोलीत राहतात. त्यांची दूर उभा राहूनच चौकशी करतो. मित्रांना भेटण्याचे टाळतो. मुलगा व मुलगी यांना जवळ घेत नाही. मास्क लावल्याखेरीज मी बाहेर पडत नाही, शववाहिकेवरील प्रत्येक चालक झोकून देऊन काम करत आहे. दिवसरात्र काम सुरू असून, प्रत्येक जण लढवय्या होऊन निष्ठेने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शववाहिकेवरील चालक

विनोद गवळी, विजय पाटील, अनिल मगदूम, उमाजी निकम, विनायक लिमकर, धीरज काळे, रोहित सोमवंशी, देवदास वासुदेव, दिगंबर वासुदेव, करण मोरे, सुशांत पोवार, सुशांत बांदेकर, प्रमित बनगे, रवींद्र बोडके, सुजित निकम, दीपक कांबळे, दिगंबर कापूसकर, रहिमतुल्ला पिंजारी, विनायक गवळी, सचिन कांबळे, अनिकेत गवळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT