कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटलेला नाही. एसटी प्रशासनाकडून कारवाईचा धडका सुरू आहे. अद्यापि ५५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यातील केवळ ४५ टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सुटीच्या काळात प्रवाशांची कोंडी झाली असून हाल सुरू आहेत.
संपकाळात एसटीला १२०० कोटींचा तोटा झाला. यापूर्वी १४०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. यातच वेतनवाढ दिल्याने वर्षाला सहाशे कोटींचा बोजा वाढला. संपादरम्यान ५ हजार ५५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. १९ हजार २४ कर्मचारी निलंबित आहेत. अद्यापि जवळपास ४० हजारांवर कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. कोल्हापूरमध्ये ११४ बडतर्फ, तर ३५० निलंबित आहेत. एसटी चालवणे मुश्कील झाले असून संप ताणल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.
तांत्रिक कर्मचाऱ्यांना तसेच वाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त चालकांनाही चालक-वाहक म्हणून नियुक्त्या देत प्रवाशी वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. संपातील जवळपास ३० हजार कर्मचारी कामावर आले आहेत. त्या आधारावर राज्यात ४५ टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. अशात प्रजासत्ताक दिन, साप्ताहिक सुटी असल्यामुळे अनेकजण परजिल्ह्यात आपापल्या गावी निघाले होते.
एसटीला गर्दी आहे. दीर्घ पल्ल्याची वाहतूक अद्यापि पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांची कोंडी झाली आहे. मराठवाड्यातून कोकण व गोव्याकडे तर कोल्हापुरातून नाशिक, औरंगाबाद, तुळजापूर, लातूर, सोलापूरकडे, कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या बसची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी आराम बस तसेच रेल्वेचा आधार घेत आहेत.
गैरसोय, फटका, वेतन पेच
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, बडतर्फीची केलेली कारवाई मागे घेतो असेही सांगितले. तरीही काही कर्मचारी मागणी व संपावर ठाम आहेत. यात प्रत्येक दिवशी लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटीच्या रोजच्या ७ ते १० कोटींच्या महसुलाला फटका बसत आहे. त्यामुळे भविष्यात महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पुरेसा महसूल मिळेल की नाही, अशी शंका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.