Students Lack Internet Data Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

"दीड जीबी' डाटा संपल्यानंतर विद्यार्थी आऊट ऑफ रेंज!

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालयांना कुलपे लागली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत जोडून ठेवण्यासाठी ऑनलाईनचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, यातून नवनवे प्रश्‍न समोर येत आहेत. ऑनलाईन क्‍लास अटेंड करताना विद्यार्थ्यांना रोज दीड जीबी डाटा अपुरा पडत आहे. त्यामुळे दीड जीबीनंतर विद्यार्थी आऊट ऑफ रेंज जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: महाविद्यालयीनस्तरावर ही अडचण निर्माण होत आहे. परिणामी, अधिकच्या रिचार्जमुळे ऑनलाईन शिक्षणाचा खर्च वाढत आहे. 

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा-महाविद्यालयांचे टाळे निघालेले नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी शिक्षणापासून तुटू नये म्हणून शासनाने शाळा बंद शिक्षण सुरू हे धोरण अवलंबले. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून घरातच शिक्षण पोचविले जाऊ लागले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणून मोबाईल काम करू लागला. 

मात्र, या ऑनलाईन शिक्षणातून नवनवे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्‍लास घेतले जात आहेत. दिवसभरात सर्वसाधारणपणे चार तास घेतले जात आहेत. त्यासाठी नियमित रिचार्जमधून मिळणारा रोजचा दीड जीबी डाटा पुरेसा पडत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर ही समस्या उद्‌भवत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी डाटा संपल्यानंतर पुढील तासांना गैरहजर राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. 

वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांनुसार एक व दीड जीबीसाठी 149, 199, 219, 249 रुपयांचे रिचार्ज आहेत. स्टर्मिंग जास्त असणाऱ्या कंपन्यांचा डाटा लवकर संपत आहे. त्यामुळे अधिकचा डाटा असणारा प्लॅन घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. दीड जीबीपेक्षा अधिकचा प्लॅन ऍक्‍टिव्ह करायचा म्हटले, तर वेगवेगळ्या कंपन्यांनुसार पूर्वीपेक्षा 50 ते 150 रुपये अधिक खर्च करावा लागत असल्याचे चित्र आहे. साहजिकच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील खर्चात वाढ होत आहे. 

"त्या'च विद्यार्थ्यांसमोर प्रश्‍न... 
शाळा-महाविद्यालय म्हटले की, सारे विद्यार्थी सारखेच नसतात. आता तर थेट संपर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांवरील नियंत्रण कमी झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन क्‍लासला दांडी मारणारेही विद्यार्थी आहेत. पण, अभ्यासू, शिक्षणाचा ध्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणालाही चांगला प्रतिसाद आहे. त्याच विद्यार्थ्यांसमोर अपुऱ्या पडणाऱ्या डाट्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

वडिलांचा मोबाईल एकाकडे, आईचा दुसऱ्याकडे 
कुटुंबात शिक्षण घेणारा एकच मुलगा, मुलगी असेल, तर फारशी अडचण नाही. पण, अनेक कुटुंबांत शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या एकापेक्षा अधिक आहे. अशा कुटुंबांत मोठी अडचण होत आहे. वडिलांचा मोबाईल एकाकडे आणि आईचा दुसऱ्याकडे अशी परिस्थिती आहे. एकच मोबाईल असेल तर वेगळाच प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संपादन - ,सचिन चराटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT