कोल्हापूर

पारंपरिक शेतीनंतर शाहूवाडीत 'या' फळ लागवडीवर दिला भर

डी. आर. पाटील

सरुड (कोल्हापूर) : शाहूवाडी (Shahuwadi)तालुक्यात यापूर्वी चहा आणि रताळी लागवडीचा मोठ्या प्रमाणात प्रयोग पूर्वी झाला आहे. मात्र येथील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रयोगशिलतेकडे वळला आहे. येथील शेतकऱ्यांनी सुमारे १४ ते १५ एकर क्षेत्रात या तैवान किंग पेरुची (Taiwan King Peru)लागवड केली आहे. (success-story-taiwan-king-guava-fruit-planted-in-14-acres-shahuwadi-farmer-marathi-news)

परळे निनाई येथे पेरू लागवडीचा शाहूवाडी तालुक्यातील हा पहिलाच नावीण्यपूर्ण प्रयोग असून, येथील शेतकऱ्यांनी थेट आंध्र प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी तेथील संकरित पेरुची रोपे आणली आहेत. हा पेरू साधारण ३०० ग्रॅम ते अर्धा किलो वजनाचा असतो. एकदा लावलेली बाग सुमारे १५ वर्षे पीक देणार आहे. पेरू लागवडीस हेक्टरी अडीच लाख रुपये शासकीय अनुदान असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळेच शासकीय अनुदानाचा लाभ उठवत हे पीक जर तालुक्यात यशस्वीपणे उभे राहिले तर शाहूवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पडीक असलेले शेती क्षेत्र पेरू लागवडीस पोषक ठरू शकते.

मी माझ्या स्वतःच्या माळरानाच्या शेतात तैवानकिंग पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. याची संकरित रोपे आंध्रप्रदेशातून जावून आणली आहेत. शासकीय अनुदानही चांगले असल्याने नावीन्यपूर्ण प्रयोगाकडे वळलो.

संतोष नवाळे, शेतकरी, परळे निनाई

शाहूवाडीत पेरू लागवडीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी अनुदान घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे तैवान किंग जातीच्या पेरुची लागवड करून पारंपरिक पिकास फाटा दिला आहे.

अभिजित धेडे, तालुका कृषी अधिकारी, शाहूवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT