Sugar Factory sakal
कोल्हापूर

गोडसाखरचं राजकारण तापलं; निर्णयाला अटकाव, तरीही प्रक्रिया पूर्ण

गोडसाखर कारखाना; शेतकरी हितासाठी निर्णय घेतल्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

गडहिंग्लज (कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (Sugar Factories) १८ पैकी १२ संचालकांनी राजीनामे दिल्याने अल्पमतातील सहा संचालकांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रादेशिक साखर सहसंचालकांनी अटकाव केला आहे. तरीही ३१ जानेवारी रोजी या संचालकांनी साखर विक्री निविदेची प्रक्रिया पूर्ण केली असून शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सत्तारुढांनी केला आहे.

गोडसाखरचे राजकारण तापले आहे. मनमानी कारभाराचा आरोप करत १२ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे सत्तारुढ सहा संचालक अल्पमतात आले आहेत. कोरम पूर्ण असलेल्या सभागृहातच धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे असल्याने सहा संचालकांवर कोरम पूर्ण होत नाही. यामुळे अल्पमतात असताना साखर विक्रीसह कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, अन्यथा कारवाईचे संकेत साखर सहसंचालकांनी लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी साखर विक्रीची निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद व चांगला दरही मिळाला आहे. शेतकरी व संचालकांच्या उपस्थितीत निविदा फोडून सर्वाधिक दराची निविदा मंजूर केली असून सहा हजार टन साखर विक्रीचा निर्णय घेतल्याचे सत्तारुढांनी सांगितले आहे. विश्‍वासाने ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना त्यांच्या घामाचे पैसे मिळायला हवेत. त्यासाठी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवून हा निर्णय घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. साखर विक्रीतून येणाऱ्या रकमेतून उत्पादकांची एफआरपीप्रमाणे बिले आणि तोडणी-ओढणीची बिलेही देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या देणीसाठी साखर विक्री करणे हा गुन्हा असेल तर ते गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे सत्तारुढ पदाधिकाऱ्यां‍सह त्या सहा संचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावर आता विरोधी बारा संचालकांसह प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT