Sugar Rate esakal
कोल्हापूर

साखर दरात वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून देशभरातील साखर कारखान्यांसाठी 24 लाख टन कोटा!

सकाळ डिजिटल टीम

साखर हंगामाची सांगता झाल्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारकडून पुढील महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला जातो.

कोल्हापूर : केंद्र सरकारने (Central Government) जुलै महिन्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांसाठी (Sugar Factories) २४ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा विक्रीसाठी जाहीर केला. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात दीड लाख टनांनी कोटा कमी केल्याने साखरेच्या दरात प्रतिक्विंटल किमान १५ ते २० रुपये वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, साखरेच्या (Sugar Rate) हमीभावातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या प्रतिक्विंटल ३१०० रुपये साखरेचा हमीभाव आहे. हा हमीभाव किमान प्रतिक्विंटल ४२०० रुपये करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर संघ व ‘ईस्मा’ने केली आहे. यावर केंद्र सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू असून, आठवडाभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

साखर हंगामाची सांगता झाल्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारकडून पुढील महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला जातो. त्याप्रमाणे आज जुलै २०२४ साठी २४ लाख मेट्रिक टन साखर विक्रीचा कोटा जाहीर केला. जुलै २०२३ मध्येही हाच कोटा होता. पण, जून २०२४ मध्ये हा कोटा २५ लाख ५० हजार लाख मेट्रिक टन होता, त्या तुलनेत पुढील महिन्याचा कोटा कमी केला आहे. मागणी व पुरवठ्या तुलनेत हा कोटा कमी असल्याने त्याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता आहे. त्यातून पुढील महिन्यात साखरेचा दर प्रतिक्विंटल १५ ते २० रुपयांनी वाढण्याची शक्यता उद्योगातून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT