कोल्हापूर

सावधान! अमेरिकन लष्करी अळीचा अटॅक: शेतकऱ्यांनो वेळीच करा उपाय

सुनील पाटील

कोल्हापूर : गेल्यावर्षी हुमणी (Humani) व लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील २०९ गावांमधील ३ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस, सोयाबीन, भुईमूग, आले व हळद पिकाला फटका बसला. पहिल्या पावसात हुमणीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer Warn) आतापासूनच याची काळजी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील ऊस पिकाला(sugarcane crop) हुमणी आणि लष्करी अळीने बेजार केले आहे. १० ते २० जून दरम्यान याचा मोठा प्रादुर्भाव होता. त्यामुळे वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर १० दिवस उसाची काळजी घ्यावी लागते. शिरोळ, करवीर, कागल व राधानगरी तालुक्यात सर्वाधिक हुमणीचा फटका बसतो.

sugarcane crop infested humni and army worms farming kolhapur marathi news

हुमणीची वाढ व फटका

बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे हुमणीची उत्पत्ती वाढण्यास गती मिळते. दोन वर्षांपासून हुमणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पिकांवर परिणाम झाला आहे. पिकांच्या मुळावरच हुमणीची उपजीविका असते. सोयाबीन, कापूस, ऊस, आले व हळद पिकाचे मोठे नुकसान करते. हुमणीची एक मादी सरासरी ५५ ते ६० अंडी देते. पावसाळा सुरू होताच हुमणीची मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी तीन वेळा कात टाकते. अंड्यातून बाहेर पडलेली हुमणी जमिनीतील कुजलेले सेंद्रिय पदार्थ खाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत ऊस, सोयाबीन, कापूस व हळद पिकांची मुळे खाते. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडतात.

अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा गिपे) फटका :

लष्करी अळी ही अंडी-अळी-कोष व पतंग अशा चार अवस्थेत या अळीचा जीवनक्रम आहे. या किडीची अळीची अवस्था पिकांसाठी नुकसानकारक असते. पिकांच्या पानावरच उपजीविका करतात. नंतर पोंग्यात शिरून आतील भाग खातात. खोडातून खात असताना तिची विष्ठा तिथेच साठून राहते. त्यामुळे पानांची प्रत खराब होते. वाढीचा भाग खाल्यामुळे तुरा बाहेर येत नाही. काही वेळा कीड कणसावरील केस, तसेच कोवळी कणसेही खातात.

जिल्ह्यातील हुमणीबाधित ऊस पीक क्षेत्र :

*तालुका* ऊस क्षेत्र* हुमणी बाधित क्षेत्र

*करवीर *२२४००*४४७

*कागल* २२३५०*६९३

*राधानगरी* ११८२०* ५२९

*गगनबावडा* ३७९५*२०

*पन्हाळा* ९७२४*३८१

*शाहूवाडी*४८३० *२७०

*हातकणंगले* २३५९४*५२१

*शिरोळ* २५६८५*५०

*गडहिंग्लज* १९७२* ४७

* आजरा*४६२५* १५०

*चंदगड* १०६११*२१५

*भुदरगड* ५७६३* १३५

एकूण* १५४४०३* ३४५८

sugarcane crop infested humni and army worms farming kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT