Latest Sugercane News: गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरचा साखर विक्रीचा घटवलेला कोटा, रेल्वेने दरात दिलेली सूट आणि सणांमुळे साखरेची मागणी व दरातही वाढ झाली आहे. आज सप्टेंबरचा विक्री कोटा २३ लाख ५० केला. गेल्यावर्षी तो २५ लाख टन होता.
त्यामुळे आजच साखरेच्या दरात प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षीचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे यावर्षीच्या सप्टेंबरचा जाहीर झालेला कोटा हा हंगामातील शेवटचा कोटा असले. १ ऑक्टोबरपासून नवा कोटा केंद्र सरकारकडून जाहीर होणार आहे.
साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये आहे. पण, गेल्या महिन्यापासून देशभरात प्रतिक्विंटल ३५०० ते ३५५० रुपये दराने साखर विक्री होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर हे तीन महिने देशभरात सणासुदीचे असतात. या काळात साखरेची मागणी मोठी असते.
पण, त्याचवेळी केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांप्रमाणेच सप्टेंबरमध्येही साखर विक्रीचा कोटा घटविल्याचा परिणाम दरावर झाला आहे. परिणामी, दर ३६०० ते ३६५० पर्यंत वाढले आहेत. अजून दहा-पंधरा दिवसांनी हाच दर प्रतिक्विंटल ३७०० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाच आहे. त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांतील सर्व साखर विक्री झाल्याने शिल्लक विक्री साठा नाही. त्यात सप्टेंबरचा कोटा दीड लाख टनांने घटविला आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून रेल्वेने साखर वाहतुकीसाठी प्रतिपोते ४० ते ५० रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे आसाम, पश्चिम बंगालमधून साखरेची मागणी वाढली आहे.
२ ऑक्टोबरपासून पश्चिम बंगालमध्ये दसरा सण सुरू होतो. त्याच्या पूर्वतयारीसाठी दहा-पंधरा दिवस अगोदरच साखरेची मागणी असते. रेल्वेची सवलत ३० सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्याचा फायदा उठविण्यासाठी अन्य राज्यांतून साखरेची मोठी मागणी अपेक्षित आहे. ऑगस्टच्या शिल्लक कोट्यास मुदतवाढ नाही. या सर्व कारणांमुळे साखरेची मागणी आणि दरही वाढले आहेत.
वर्ष २०२२-२३ २०२३-२४
ऑक्टोबर २३.५० २९.००
नोव्हेंबर २२.०० २३.५०
डिसेंबर २२.०० २४.००
जानेवारी २२.०० २३.००
फेब्रुवारी २१.०० २२.००
मार्च २२.०० २३.५०
एप्रिल २४.०० २५.००
मे २४.०० २७.००
जून २३.५० २५.५०
जुलै २४.०० २४.००
ऑगस्ट २३,५० २२.००
सप्टेंबर २५.०० २३.५०
एकूण २७६.५० २९१.५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.