कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजपासूनच ऑक्सिजनसह रेमडीसिव्हिवर इंजेक्शनचा (Injection on Remdesivir)ही वाढीव पुरवठा सुरू झालेला आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला .
supply of oxygen to the Kolhapur district increased kolhapur covid 19 update
मुश्रीफ म्हणाले, कोरोनाची भयावह परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपायोजना करण्यासाठी आपण स्वतः व पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेलो होतो. ऑक्सीजन व रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी त्याठिकाणी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्यासह १५ टन ऑक्सीजन वाढवून मिळालेला आहे. जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत.
कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल. कोल्हापुर जिल्ह्याला दररोज ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता. तो वाढून उद्यापासून सरासरी ४५ टन आणि अधिक टन ऑक्सिजन पुरवठा होईल. जिल्ह्याला दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे इंजेक्शन मिळत होती. रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू झालेला असून आजच अडीच हजाराहून अधिक इंजेक्शन पुरवठा झालेले आहेत.
supply of oxygen to the Kolhapur district increased kolhapur covid 19 update
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.