Pre-Monsoon esakal
कोल्हापूर

Pre-Monsoon : मॉन्सूनपूर्व पावसावेळी अशा पद्धतीने घ्या तुमची काळजी

सकाळ वृत्तसेवा

Pre-Monsoon : मे महिना सुरू झाला की मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते; याला वळीव पाऊस असेही म्हणतात. जोराचा वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडून जाते. विजांचा कडकडाटही पाहायला मिळतो अशावेळी निसर्गापुढे अतिशहाणा करून चालत नाही, अन्यथा मृत्यूशी गाठ पडते.

अवकाळी पावसाबरोबर कोसळणारी वीज आणि ढगांच्या गडगडाटापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तसे नियमही घालून माहिती दिली आहे.

अशी खबरदारी घेणे आवश्‍यक...

  • विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नका. घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा.

  • उंच जागेवर जाणे टाळा.

  • विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका.

  • घरात असाल तर दारे-खिडक्या बंद करा.

  • गाडीत असल्यास काचा बंद ठेवा.

  • चार-पाच जण एकत्र असाल तर प्रत्येकामध्ये सुरक्षित अंतर ठेवा.

  • मोबाईल फोनचा वापर टाळा.

  • विजा चमकत असताना कुठल्याही ठिकाणी पोहणे धोकादायक असते.

  • एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळली तर तातडीने प्रथमोपचारासाठी प्रयत्न करा.

  • वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तरी काही धोका नसतो.

  • वीज कोसळून संकटात सापडलेल्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्‌वास सुरळीत आहे का, हे सावधगिरीने तपासा.

  • त्या व्यक्तीचा श्‍वासोच्छ्‌वास बंद पडला असेल तर तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास द्या.

  • अशावेळी घाबरून न जाता आपत्कालीन सेवा देणाऱ्या १०७८ या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT