कोल्हापूर

Tauktae Cyclone Effect : ऊस, सुर्यफूलासह उन्हाळी भाताला फटका

चक्रीवादळाचा परिणाम; शेतात उन्मळून पडली मोठे वृक्ष

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात तौत्के (tauktae cyclone update) चक्री वादळाचा फटका ऊस आणि उन्हाळी (summer) पिकाला बसला. मूसळधार पावसाच्या (heavy rain) मोठ्या थेंबांनी उस, मका, सुर्यफूलाची पाने फाटल्यामुळे या पिकांची उंची वाढण्यास समस्या येणार आहे. जिल्ह्यातील (kolhapur district) गगनबावडा, आजरा, गडहिंग्लजस करवीर तालुक्‍यातील पिकांना कालच्या वादळाचा फटका बसला आहे. मात्र, याचा खरीप पेरणीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. (tauktae cyclone update affects summer crops in kolhapur)

जिल्ह्यात यावर्षी राज्यात चांगला पाऊस होणार आहे. खरीप हंगामाला पोषक पाऊस होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. वळीव पावसानंतर खरीपाच्या पेरणीला सुरुवात होते. यावर्षी वळीव येण्यापूर्वीच तौत्के हे चक्रीवादळ आले आहे. त्यामुळे वळीव पाऊस वेळेत होईल का? ही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ऊस उन्मळून पडला आहे. तर सुर्यफूले झाडे वाऱ्याने वाकली आहे. अशा सुर्यफूल परिपक्व झाली नसल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

जिल्ह्यातील गगनबावडा (gaganbawda) तालुक्‍यात कोकणात (kokan) झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, खरीपासाठी सध्या सुरु असलेली धुळवाफ कालच्या पावसामुळे किमान दोन ते तीन दिवस बंद ठेवावी लागणार आहे. याशिवाय, काहींनी पंधरा ऑगस्टला लागण केललेल्या उसाला खतांचा (fertilizer) डोस देण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांने (farmers) पूर्वी विकत घेतलेली खते शिल्लक आहेत. त्या शेतकऱ्यांनी चक्रीवादळाच्या पावसाचा फायदा झाला आहे.

शेतात लावली मोठ मोठी झाडे काल झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत. यामध्ये नारळ, निलगिरी, पिंपळ, लिंबाची झाडांचा समावेश आहे. ऊस, सुर्यफूलाच्या शेतात झाडी पडल्यामुळे मोठे नूकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 6 ते 7 हजार एकर वरील शेतीला या वादळाचा फटका बसल्याचा प्राथमक अंदाज आहे. दरम्यान, काल झालेल्या नुकसानीची कृषी विभागाकडून (agricultural department) माहिती घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT