kolhapur zp sakal
कोल्हापूर

शासन निर्णयाला डावलून शिक्षक ‘बदल्या’

दोषींवर शिस्‍तभंगाच्या कारवाईची शिफारस; अर्धा डझन अधिकारी, कर्मचारी अडचणीत

सदानंद पाटील

दोषींवर शिस्‍तभंगाच्या कारवाईची शिफारस; अर्धा डझन अधिकारी, कर्मचारी अडचणीत

कोल्‍हापूर : ग्रामविकास, शालेय शिक्षण विभागाने शिक्षक बदलीचे जे धोरण ठरवले त्यालाच हरताळ फासण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागाने(primary education department) केले. राज्यातील पाच विभागांत शासनाच्या नियमानुसार बदल्या करण्यात आल्या; मात्र राज्यात फक्‍त कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेनेच(kolhapur jilha parishad) शिक्षक बदल्या करताना शासनाच्या नियमांचे उल्‍लंघन केले. जिल्‍हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरण हे गंभीर असल्याने अर्धा डझन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्‍तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चंद्रकांत गुडेवार समितीने विभागीय आयुक्‍तांना केली आहे. गुडेवार समितीच्या शिफारशीने सामान्य प्रशासन विभाग व प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

शासनाकडून अभिप्राय नाही

जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या बदल्यांचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठवला आहे. याबाबत शासनाने हा प्रस्‍ताव ‍स्वीकारला किंवा नाकारल्याबाबतचा कोणताही अभिप्राय दिलेला नाही. जर बदल्या नाकारल्या तर संबंधित शिक्षकांना पूर्वपदावर हजर व्‍हावे लागणार आहे, तर बदल्यांचा प्रस्‍ताव ‍स्वीकारला तर चौकशी अहवालाचे काय, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.

teacher

शिक्षक बदली प्रकरण व चौकशी

जिल्‍हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २०१८ ला शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या केल्या; मात्र या बदल्या करताना शासनाच्या नियमांचे उल्‍लंघन करण्यात आले. चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्याची तक्रार सुळकूड (ता. कागल) येथील मलगोंडा यलगोंडा पाटील यांनी विभागीय आयुक्‍तांकडे केली होती. या प्रकरणी जिल्‍हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. हा विषय मंत्रालयापर्यंतही पोहोचला. तक्रारदाराच्या पाठपुराव्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी सांगली जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने २८ व २९ सप्‍टेंबरला या प्रकरणाची जिल्‍हा परिषदेत येऊन चैकशी केली. त्यानंतर १४ ऑक्‍टोबर २०२१ रोजी विभागीय आयुक्‍तांना अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कारवाईकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT