Testing for drive-in theater; Enjoy the movie while sitting on the ground 
कोल्हापूर

ड्राइव्ह इन थिएटरसाठी चाचपणी ; मैदानावर बसून घेता येणार चित्रपटाचा आनंद 

सुयोग घाटगे

कोल्हापूर  : मोठे मैदान , त्यावर मोठा पडदा आणि त्या पडद्यवरील चित्रपटाचा आता मैदानावर बसून आनंद घेता येणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला हा आंनद येणार आहे. कोरोनामुळे बंद असणारी देशातील चित्रपटगृहे तूर्तास तरी बंद असल्यामुळे अशा प्रकारच्या ड्राइव्हइन थेटरच्या चाचपणीला सुरवात झाली आहे. 
कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्र संकटात आहे. चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्याचे प्रदर्शन करण्यापर्यंत मर्यादा आहेत. अनेक चित्रपटगृह चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे . बंद चित्रपटगृहांना मेंटेनन्सपोटी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे यातून मार्ग शोधण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. यातच भारतात प्रचलित असणारी जुनी पद्धत नव्या रूपात मनोरंजनासाठी आणण्याची तयारी सुरु आहे. 
पूर्वी यात्रा,जत्रांत असणारे 'तंबू सिनेमा' नव्या ढंगात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. याला 'ड्राइव्ह इन थिएटर' या गोंडस नावाने ओळखले जाते. स्वतःच्या वाहनात बसूनच मोठ्या पडद्यावरील चित्रपट पाहण्याची संकल्पना देशभरातील प्रमुख राज्यांत अस्तित्वात आणायची तयारी सुरु आहे. यात महाराष्ट्राचे नाव अग्रेसर आहे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी देशातील अग्रगण्य चित्रपटगृहांची शृंखला चालवणारे समोर आले असून त्यांनी याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा समावेश पहिल्या टप्यात आहे. 
यासाठी केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. यामुळे येत्या काळामध्ये सोशल डिस्टंसिंग सांभाळून चित्रपटांची मज्जा घेया येणार आहे. 

सुरक्षेच्यादृष्टीने आणि बंद असणाऱ्या मनोरंजन क्षेत्रासाठी चालना देणारा हा प्रयोग कौतुकास्पद आहे. या प्रयोगाने जुनी अनुभूती नव्याने अनुभवायला मिळणार आहे मात्र याचे स्वरूप मर्यादित असणार आहे. याहीपेक्षा सिनेमागृहे सुरु करण्यासाठीचे धोरण निश्‍चित होण्याची गरज आहे. 
- ऋतुराज इंगळे, सिनेमागृह मालक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT