कोल्हापूर : दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी सहकुटुंब बाहेर जाताय तर थोडे सावधान राहा. बंद घरांना लक्ष करणारे चोरटे, याकाळात अधिक सक्रिय होतात. त्याची झलकही चोरट्यांनी महिन्याभरात दाखवली आहे.
दिवाळी अगर उन्हाळी सुटीला पर्यटनाला अगर नातेवाइकांकडे राहायला जाण्याचे प्रमाण अधिक असते. हीच संधी साधण्यासाठी चोरटे तयार असतात. बंद घरावर हात साफ करतात. सुटीला बाहेर जाताना काळजी घ्या, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून वारंवार केले जाते. तरीही घाईगडबडीत त्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. नंतर त्यांना पश्चाताप करून घ्यावा लागतो. काही दिवसांपासून चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. महाद्वाररोडवरील गर्दीचा फायदा घेत सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यापाठोपाठ जवाहर हौसिंग सोसायटीतील बंद घराचा कंडी कोंयडा उचकटून चांदीची भांडी लंपास केली. सम्राटनगर येथील बंद घर फोडून त्यातील एक लाखांची रोकडसह किमती ऐवज लंपास केला. इतकेच नव्हे तर महाद्वाररोडसारख्या गजबजलेल्या परिसरातील कपड्याचे दुकान फोडून सुमारे 45 हजारांचे कपडे चोरून नेले. घडलेल्या प्रकारातून बंद घरावर चोरटे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येते.
पोलिसांकडून आवाहन...
*घर बंद करून जाताना मौल्यवान वस्तू लॉकर्सला ठेवा
* अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवा
*सुरक्षारक्षकाची नेमणूक करा
* नोंद वहीसह गस्तीबाबत सुरक्षारक्षकाला सूचना द्या
*शेजाऱ्यांना याबाबतची माहिती द्या
*दरवाजाला सायरन सिस्टीम बसवा
मार्च ते जुलै 2020 अखेर चोरीचा तपशील
प्रकार मार्च एप्रिल मे जून जुलै
*दरोडा 1 3 3 - -
*जबरी चोरी 13 4 5 4 8
*घरफोडी 17 23 13 17 13
*इतर चोऱ्या 56 19 38 66 57
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.