thirty first party for this year on thursday but its veg day in kolhapur 
कोल्हापूर

सरत्या वर्षाला निरोप यंदा शाकाहारानेच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या कटु आठवणींना तिलांजली देत यंदा कोल्हापूरकर सरत्या वर्षाला निरोप देणार आहेत. मात्र, थर्टी फर्स्ट आणि मार्गशीर्ष गुरूवार, गुरूपुष्यामृत एकाच दिवशी आल्याने यंदा शाकाहारानेच घरोघरी आनंदोत्सवावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, थर्टी फर्स्ट सेलीब्रेशनच्या पार्टीवरही यंदा मर्यादा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

कोल्हापूर आणि मांसाहार हे एक अतूट समीकरणच. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तर जोरदार आनंदोत्सवाची तयारी प्रत्येक वर्षी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या सार्वजनिक ठिकाणी आनंदोत्सवाला मर्यादा येणार आहेत. तीस डिसेंबरला बुधवारी मांसाहाराचा बेतही यंदा अनेक ठिकाणी नसेल. कारण या दिवशी रेणुका देवीची सौंदत्ती यात्रा आहे. ही यात्रा यंदा रद्द झाली असली तरी त्यानिमित्ताने पाळली जाणारी परंपरा घरोघरी जपली जाणार आहे तर 29 डिसेंबरला मंगळवारी दत्त जयंती आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने 27 डिसेंबरलाच बहुतांश ठिकाणी मांसाहारावर ताव मारला जाणार आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT