कोल्हापूर : मैत्रीला धर्म, जात, भाषा, प्रदेश कशाचाच अडथळा नसतो, एकदा का मैत्रीचं नातं घट्ट झालं की, मग संकटात ही मैत्रीच्या आनंदाचे सोहळे साजरे करता येतात. अशीच यशस्वी मैत्रीची गोष्ट आहे, शिवाजी विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेल्या तिघा मित्रांची. सुभाष पाटील, सूरज पुरी व अमित पवार या तिघा मित्रांनी मैत्रीच्या जोरावर स्वतःची जाहिरात फर्म स्थापन करत यशाचा नवा मंत्र युवकांना दिला आहे.
चार वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात शिकण्यासाठी दिघे दाखल झाले. वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिक्षणाच्या निमित्ताने ते एकत्र आले. सुभाष पाटील कावणे, (ता. करवीर) येथील. सूरज बीड जिल्ह्यातील वडवणीचा तर अमित आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडीचा. हळूहळू ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. विचारांची देवाण घेवाण होऊ लागली. तिघांच्या तीन वेगवेगळ्या भाषा, वेगळे स्वभाव, वेगवेगळे विचार अन् राहणीमान ही. कोल्हापूचा सुभाष रांगडा पण समजूतदार. सूरज कष्टाळू अन् उत्साही. अमित अवर्षणग्रस्त भागातील कायम अस्वस्थ पण संवेदनशील. या तिघांचं त्रिकुट चांगल जमलं.
शिक्षण घेत मौज मजा करणे, भटकंती करणे, परीक्षेच्या वेळी एकत्रित अभ्यास करणे अशी दोन वर्ष निघून गेली. अंतिम वर्षाची परीक्षाही संपली. अन् विद्यापीठातून तिघे बाहेर पडले. ते आपआपल्या घरी निघून गेले; पण एकमेकांशिवाय त्यांना करमेना. गेल्या वर्षी कोरोना महामारी सुरू झाली. भेट ही थांबली. फोनवर बोलणं सुरू होतच. शिक्षण संपल होतं पण नोकरी नाही, काम धंदा नाही. अशातच सुभाषला कल्पना सुचली जर तिघांना परत एकत्रित यायचं असेल तर काही तरी व्यवसायच सुरू करायला हवा, अशी त्याने योजना आखली. सूरज आणि अमितला ही कल्पना सांगितली, तिघांचा विचार झाला. आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून जाहिरात, फोटोग्राफी क्षेत्रात काम करण्याचे तिघांनी ठरवले.
कोल्हापुरात त्यांनी अपडेट मीडिया नावाने फर्म सुरू केली. जाहिरात, पॉलिटिकल कँम्पियनिंग, वेडिंग फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी मेकिंग अशी कामे घेत नवा व्यवसाय उभारला आहे. तिघांच्या वेगवेगळ्या कौशल्याचे एकत्रीकरण झाल्याने त्याचे काम नावारूपाला येत आहे. मैत्रीच्या जोरावर कष्टाने ते महिन्याला हजारोंची उलाढाल करत आहेत. त्यांच्या मैत्रीचा हा यशस्वी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.